ICC Test Ranking : जो रूटने टेस्ट क्रिकेटमध्ये कोहली, स्मिथ, बाबरला मागे टाकून पटकावले पहिले स्थान

Joe Root
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दुबई : वृत्तसंस्था – इंग्लंडचा बॅट्समन जो रूट आयसीसीने (ICC Test Ranking) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. मागच्या दीड वर्षापासून जो रूट जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये रूटने 176 रनची शतकी खेळी केली होती, तसंच त्याच्या या सामन्यात टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रनही पूर्ण झाल्या. हा विक्रम करणारा रूट इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन मागच्या वर्षी डिसेंबरपासून पहिल्या क्रमांकावर होता, पण रूटने शतक करत पहिला क्रमांक गाठला. लाबुशेन रूटपासून फक्त 5 पॉईंट मागे आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातही टेस्ट सीरिज होणार आहे, त्यामुळे लाबुशेनला पुन्हा एकदा पहिला क्रमांक गाठण्याची संधी आहे.

आयसीसीने जाहीर केली नवी टेस्ट क्रमवारी
आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या टेस्ट क्रमवारीमध्ये (ICC Test Ranking) 31 वर्षांचा जो रूट 897 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा लाबुशेन 892 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे दोन बदल वगळता टॉप-10 मध्ये इतर कोणताही बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 845 पॉईंट्ससह तिसऱ्या, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 815 पॉईंट्ससह चौथ्या आणि केन विलियमसन 798 पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. कोरोना व्हायरसमुळे विलियमसन इंग्लंडविरुद्धची दुसरी टेस्ट खेळू शकला नव्हता.

भारताचे रोहित-कोहली टॉप-10 मध्ये
श्रीलंकेचा टेस्ट कर्णधार दिमुथ करुणारत्ने 772 पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा 757 पॉईंट्सह सातव्या, रोहित शर्मा 754 पॉईंट्ससह आठव्या, ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड 744 पॉईंट्ससह नवव्या आणि विराट कोहली 742 पॉईंट्ससह 10व्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंत 11व्या आणि मयंक अग्रवाल 20व्या क्रमांकावर आहे.

बुमराहला एका स्थानाचा फायदा
न्यूझीलंडचा फास्ट बॉलर काईल जेमिसन दुखापतीमुळे दुसऱ्या टेस्टमधून बाहेर झाला, त्यामुळे त्याला 3 क्रमांचे (ICC Test Ranking) नुकसान झालं आहे. जेमिसन आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स 901 पॉईंट्ससह पहिल्या, आर.अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहेत.तर जसप्रीत बुमराहला एक स्थानाचा फायदा झाल्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी चौथ्या क्रमांकावर आहे.

हे पण वाचा :
आदित्यजी लवकर तुमचे शुभमंगल होवो आणि सीतामाईसारखी सूनबाई आम्हाला मिळो; भाजप नेत्याने दिल्या शुभेच्छा

SUV खरेदी करायची आहे ??? त्याआधी ‘हे’ टॉप 10 मॉडेल पहा

LIC पॉलिसी कशी सरेंडर करावी ???

ठाकरे सरकार टक्केवारी, वसुलीमध्ये खूश पण आम्ही झोपू देणार नाही…; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

कुत्ते की मौत मरेगा; मोदींवर टीका करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली