मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC Test Rankings) बुधवारी कसोटी खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम यांना फायदा झाला आहे. तर जसप्रीत बुमराहला गोलंदाजी क्रमवारीत नुकसान सोसावे लागले आहे. कसोटी क्रिकेटच्या फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली असे केवळ दोनच भारतीय टॉप – 10 मध्ये आहेत. या क्रमवारीत (ICC Test Rankings) रोहित शर्मा 8 व्या तर विराट कोहली 10 व्या क्रमांकावर आहे.
या क्रमवारीत (ICC Test Rankings) नुकताच 10 हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या जो रूटला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला एक स्थानाचा फायदा झाला असून तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याचबरोबर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला दोन स्थानांचे नुकसान झाले असून त्याची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्नस लाबूशेनने अव्वल स्थान पटकावले आहे. लाबूशेनचे 892 गुण आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रूटचे 882 गुण आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
गोलंदाजांच्या टॉप 10 च्या यादीत दोन भारतीय गोलंदाजांना स्थान मिळाले आहे. यामध्ये फिरकीपटू रविचंद्रन अश्विन 850 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर (ICC Test Rankings) स्थिर आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एका स्थानाचे नुकसान झाले असून तो चौथ्या स्थानावर गेला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने या यादीत दोन स्थानांची झेप घेतली असून तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे.
हे पण वाचा :
भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या…
पांढर्या चंदनाची लागवड करून मिळवा भरपूर पैसे !!!
पंकजा मुंडे समर्थकाचा विष पिण्याचा प्रयत्न; उमेदवारी नाकारल्याने उचलले टोकाचे पाऊल
Repo Rate वाढल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँकांची कर्जे महागली