पंकजा मुंडे समर्थकाचा विष पिण्याचा प्रयत्न; उमेदवारी नाकारल्याने उचलले टोकाचे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 20 जूनला विधानपरिषद निवडणूक होणार असून भाजपने आपल्या 5 नेत्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र यावेळी देखील पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली. त्यातच आता अहमदनगर येथील एका समर्थकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मुकुंद गर्जे अस त्या समर्थकाचे नाव आहे. पिकांवर मारणारे कीटकनाशक पिण्याचा त्याने प्रयत्न केला. भावना अनावर झाल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. परंतु वेळीच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांच्यावर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धक्कादायक प्रकरणाने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भाजपकडून विधान परिषदेसाठी राम शिंदे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, उमा खापरे, आणि , भाजपचे राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्या उमेदवारी साठी आम्ही खूप प्रयत्न केले मात्र पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला पंकजाताईंना वेगळी काही जबाबदारी सोपवायची असेल. यामुळे त्यांना उमेदवारी दिली नसावी असे विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

Leave a Comment