हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार की नाही, याबाबतचा निर्णय आयसीसी लवकरच घेणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे काही दिवसांमध्येच विश्वचषक रद्द होणार का आणि आयपीएल खेळवली जाणार का, या गोष्टीचा निर्णय आपल्याला पाहता येणार आहे.
करोना व्हायरसमुळे आतापर्यंत विश्वचषक खेळवायचा की नाही, याबाबत आयसीसीला अजूनही निर्णय घेता आलेला नाही. कारण विश्वचषक ही एक मोठी स्पर्धा असते. त्यामुळे करोनानंतर ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेचे आयोजन करता येणार आहे की नाही, याबाबत आयसीसी माहिती घेत आहे. त्याचबरोबर विश्वचषक खेळवायचा झाला तर खेळाडूंसाठी सुरक्षिततेचे काय उपाय करावे लागतील, यावरही आयसीसी विचार करत आहे.
विश्वचषक रद्द होईल, असे बीसीसीआयला वाटत आहे. विश्वचषक रद्द झाल्यावर आयपीएलचा मार्ग मोकळा होणार असल्याचे दिसत आहे. कारण विश्वचषक जर खेळवला गेला तर आयपीएल होऊ शकत नाही, असे चित्र आहे. त्यामुळे आयसीसीच्या या निर्णयावर सर्वात जास्त लक्ष ठेवून बीसीसीआय असणार आहे.
हे पण वाचा –
म्हणुन रेखाने दिला कोरोना चाचणीसाठी नकार…
रिया चक्रावर्तीची सुशांतसाठी भावनिक पोस्ट! काय लिहले आहे ते पाहा…
रशियाची ‘ती’ बहुचर्चित लस बाजारात कधी येणार? उत्तर मिळालं
१ लाख गुंतवून कमवू शकता ६० लाख रु, सुरु करा ‘या’ झाडाची शेती
गुड न्यूज! ‘या’ कंपनीने बनवले कोरोनावर औषध; एका इंजेक्शनची किंमत ८ हजार रुपये आहे