हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत अनेकदा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. या दरम्यानच, आता खासगी क्षेत्रातील ICICI Bank ने आपल्या बल्क एफडीवरील व्याज दरात वाढ केली आहे. बँकेने 2 कोटी ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याज दरात वाढ केली आहे. नवीन दर आज 22 मार्च 2023 पासून लागू झाले आहेत. बँकेने बल्क एफडीवरील व्याजात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँक आता 15 महिन्यांच्या FD वर ग्राहकांना 7.25 टक्के व्याज देत आहे.
हे जाणून घ्या कि, ICICI Bank ने फेब्रुवारीमध्येच बल्क एफडीचे व्याजदर वाढवले होते. आजच्या या दरवाढीनंतर आता बँकेकडून 7 दिवस ते 14 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 4.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 4.75 टक्के व्याज मिळणार आहे. त्याच वेळी, 15 दिवस ते 29 दिवसांच्या एफडीवर, सामान्य नागरिकांना 4.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 4.75 टक्के व्याज मिळेल.
ICICI Bank च्या FD वरील व्याज दर पहा
आता ICICI Bank कडून 30-45 दिवसांच्या FD वर सर्वसामान्यांना 5.50% तर ज्येष्ठ नागरिकांना 5.50% व्याज मिळेल. त्याच प्रमाणे 46 ते 60 दिवसांच्या FD वर सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.75 टक्के व्याज मिळेल. तसेच 61 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 6% व्याज, 91 दिवस ते 120 दिवसांच्या FD वर 6.50% व्याज, 121 दिवस ते 150 दिवसांच्या FD वर 6.50% व्याज आणि 151 दिवस ते 184 दिवसांच्या FD वर 6.50% व्याज मिळेल’
ICICI Bank कडून आता 211 दिवस ते 270 दिवसांच्या FD वर 6.65 टक्के, 271 दिवस ते 289 दिवसांच्या FD वर 6.75 टक्के तर 389 ते 1 वर्षाच्या FD वर बँक 7.25 टक्के व्याज देईल. तसेच 390 दिवस ते 15 महिन्यांच्या FD वर 7.25 टक्के, 15 ते 18 महिन्यांच्या FD वर 7.15 टक्के, 2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षांच्या FD वर 7.00 टक्के आणि 3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्षांच्या FD वर सर्व ग्राहकांना 6.75 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ
8 फेब्रुवारी रोजी RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीनंतर बोलताना सांगितले की,” जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://theunitybank.com/
हे पण वाचा :
New Business Idea : घरबसल्या कमी खर्चात ‘हे’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
ड्यू डेटनंतरही पेनल्टीशिवाय भरता येते Credit Card चे बिल, जाणून घ्या RBI चे नियम