हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या ICICI Bank कडून सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता त्यांना FD वर 6.80% पर्यंत व्याज मिळू शकेल. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदर दिला जाणार नाही. 23 नोव्हेंबरपासून हे दर 2 कोटी ते 5 कोटींच्या FD वर लागू असतील.
ICICI Bank कडून 3.75 टक्के ते 6.80 टक्के व्याज दर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कमीत कमी कालावधी 7 दिवस तर जास्तीत जास्त कालावधी 10 वर्षांसाठी पैसे जमा करता येतील.
कोणत्या कालावधीसाठी किती व्याज मिळेल ???
ICICI Bank च्या वेबसाइट वरील माहिती नुसार, आता बँक 1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 6.75 टक्के, 15 महिने ते 3 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 6.50 टक्के, 3 वर्षे, 1 दिवस ते 10 वर्षे कालावधीसाठी 6.80 टक्के व्याज दर देईल. आता बँक 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 6.25% तर 185 दिवस ते 270 दिवसांच्या कालावधीसाठी 6% व्याज दर देईल.
हे लक्षात घ्या कि, बँकेकडून 91 दिवसांपासून ते 184 दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी 5.75%, 61 दिवस ते 90 दिवसांच्या कालावधीसाठी 5.25%, तर 46 दिवस ते 60 दिवसांसाठी 5%, 30 दिवस ते 45 दिवसांच्या कालावधीसाठी 4.75% आणि 7 दिवसांपासून ते 29 दिवसांपर्यंतच्या लहान कालावधीसाठी, 3.75 टक्के व्याजदर दिला जातो आहे.
5 कोटीं रुपयांपेक्षा जास्तीच्या रकमेवरील व्याज दर
हे लक्षात घ्या कि, ICICI Bank कडून 5 कोटी आणि त्यावरील एफडीवर 23 नोव्हेंबरपासून कमीत कमी 3.75% तर जास्तीत जास्त 7.15% पर्यंत व्याजदर देत आहे. तसेच या एफडींमध्ये मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
मात्र ICICI Bank कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्ससाठीच्या FD वरील व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. यामध्ये सर्वसामान्यांना FD वर 3% ते 6.60% पर्यंत तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.10% पर्यंत व्याज दर दिला जातो आहे. यासोबतच 5 वर्षांची टॅक्स सेव्हिंग एफडी स्कीम 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्ससाठी देखील लागू आहे. यावर ग्राहकांना जास्तीत जास्त 1.5 रुपयांच्या कर कपातीचा लाभ घेता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/Personal-Banking/account-deposit/fixed-deposit/fd-interest-rates.page
हे पण वाचा :
Redmi A1 मध्ये कमी किंमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स, किंमत तपासा
PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता एटीएममधून काढता एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम
आता मोबाईल नंबरशिवाय अशा प्रकारे डाउनलोड करा Aadhar Card, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
FD Rates : देशातील 4 मोठ्या बँकांपैकी कोणत्या बँकेच्या FD वर सर्वोधिक व्याज मिळेल ते पहा
Train Cancelled : रेल्वेकडून 154 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा