हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : आता ऑगस्टचा महिना सुरु झाला आहे. मात्र हा नवीन महिना सुरू होताच ICICI बँकेने आपल्या ग्राहकांना एक धक्का दिला आहे. सोमवारी बँकेकडून मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) म्हणजेच कर्जावरील व्याजदरात 0.15 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. RBI च्या MPC बैठकीपूर्वीच बँकेने ही वाढ केली आहे.
MPC च्या बैठकीत पॉलिसी रेट मध्ये आणखी 25-35 बेसिस पॉइंट्सने वाढ होण्याची अपेक्षा तज्ञ व्यक्त करत आहेत. यामुळे बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्थाकडून याआधीच व्याजदरात वाढ केली जात आहे. यामुळे आता ग्राहकांच्या कर्जाच्या EMI मध्ये देखील वाढ होणार आहे आता 1 ऑगस्टपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहे. चला तर मग बँकेकडून MCLR मध्ये वाढ झाल्यानंतर नवीन व्याजदर कसे असतील ते पाहूयात… ICICI Bank
असे असतील नवीन व्याज दर
आता ओव्हरनाइट कर्जावर नवीन व्याज 7.65 टक्के दिले जाईल. यानंतर 1 महिना, 3 महिने आणि 6 महिन्यांचा व्याजदर अनुक्रमे 7.65, 7.70 आणि 7.85 टक्के असेल. त्याच वेळी, एक वर्षाच्या कर्जावरील व्याजदर 7.90 टक्के असेल. इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की रिटेल लोन मार्केटमध्ये 1 वर्षाची मुदत असलेली कर्जे जास्त महत्त्वाची मानली जातात कारण दीर्घ मुदतीची कर्जे याच दरावर आधारित असतात. ICICI Bank
अनेक बँकांनी व्याजदरात केली वाढ
ICICI Bank व्यतिरिक्त, पंजाब नॅशनल बँकेने देखील त्यांच्या विविध मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात 10 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. सोमवारपासूनच PNB चे नवे दर लागू झाले आहेत. मात्र, होम लोन घेणार्यांसाठी नवीन व्याजदर रिसेट तारखेनंतरच लागू होतील. याशिवाय होम लोन देणाऱ्या एचडीएफसी लिमिटेडनेही व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली. त्याच वेळी, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने होम लोन आणि MSME (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) च्या कर्जावरील व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली होती.
MPC ची बैठक
या आठवड्यात RBI च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक होणार आहे. यावेळी महागाई नियंत्रित करण्यासाठी MPC कडून पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली जाऊ शकेल. याआधी, मे आणि जूनमध्ये देखील MPC ने सलग दोन वेळा रेपो दर वाढवून तो 4.90 टक्क्यांवर आणला होता. मात्र, तज्ञांचे म्हणणे आहे की, हे अजूनही प्री-कोविड -19 च्या पातळीपेक्षा कमी आहेत आणि त्यात आणखी वाढ दिसून येईल. मात्र असे झाल्यास सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण आणखी वाढेल. ICICI Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/Personal-Banking/loans/personal-loan/personal-loan-interest-rates.page
हे पण वाचा :
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज फक्त 50 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा लाखो रुपये !!!
Asia Cup 2022 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार !!!
EPS-95 अंतर्गत अनाथ मुलांना EPFO कडून दिली जाते पेंशन !!!
Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण !!! नवीन दर पहा
‘या’ बँकाकडून कमी व्याज दरात मिळेल Home Loan !!!