हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. यानंतर जवळपास सर्वंच बँकांकडून आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली. FD मधील व्याज वाढवण्याची ही प्रक्रिया अजूनही संपलेली दिसत नाही. काही बँकांकडून अजूनही व्याजदरामध्ये वाढ केली जात आहे. आता ICICI बँकेने देखील आपल्या FD वर जास्त व्याज देण्याची घोषणा केली आहे. 7 जूनपासून बँकेकडून हे नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत.
ICICI Bank कडून आपल्या FD वरील 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या व्याजदरात बदल केले आहेत. बँकेने आता 7 दिवसांपासून ते 5 वर्षांच्या कालावधीच्या FD वर जास्त व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन व्याजदर काय आहेत ???
ICICI Bank कडून आता 7 दिवस ते 14 दिवसांच्या FD वर 3.00 टक्के व्याज दिले जाईल. त्याच वेळी, 15 दिवस ते 29 दिवसांच्या FD वर वार्षिक 3.00 टक्के दराने व्याज मिळेल. याशिवाय, बँक आता सर्व ग्राहकांना 30 ते 45 दिवस आणि 46 ते 60 दिवसांच्या FD वर 3.25 टक्के व्याज देईल.
ICICI Bank कडून आता 61 ते 90 दिवसांच्या FD वर 3.40 टक्के वार्षिक दराने व्याज दिले जाईल. तसेच 91 ते 120 दिवसांच्या FD वर आता 4.25 टक्के दराने व्याज मिळेल. त्याचप्रमाणे, 121 दिवस ते 150 दिवसांच्या FD वर 4.25 टक्के व्याज दिले जाणार आहे.151 ते 184 दिवसांच्या FD वर 4.25 टक्के दराने व्याज मिळेल.
याबरोबरच बँक आता 185 ते 210 दिवस आणि 211 ते 270 दिवसांच्या FD वर 4.50 टक्के व्याज देईल. तसेच 271 ते 289 दिवसांच्या आणि 290 ते 1 वर्षाच्या FD वर 4.70 टक्के वार्षिक व्याज मिळेल. त्याचबरोबर 1 वर्ष ते 389 दिवसांसाठीच्या FD वर 4.95 टक्के दराने व्याज मिळेल. 390 दिवसांपासून ते 15 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 4.95 टक्के दराने व्याज मिळेल.
आता 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठीच्या FD वर बँकेकडून 5.00 टक्के व्याज दिले जाईल. तसेच 18 महिने ते दोन वर्षांच्या FD वर वार्षिक 5% दराने व्याज मिळेल. त्याचबरोबर दोन वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे आणि 3 वर्षे एक दिवस ते 5 वर्षे मुदतीच्या FD वर 5.25 टक्के व्याज दिले जाईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/Personal-Banking/account-deposit/fixed-deposit/fd-interest-rates.page
हे पण वाचा :
Credit Card युझर्सना आता UPI द्वारेही पेमेंट करता येणार !!!
Rapo Rate Hike : होम आणि ऑटो लोनवर आणखी किती व्याज द्यावे लागणार ???
education loan : ‘या’ बँकामध्ये कमी व्याजदराने मिळेल शैक्षणिक कर्ज !!!
Ration Card मध्ये घरातील नवीन सदस्याचे नाव नोंदवण्याची प्रक्रिया जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण !!! नवीन भाव तपासा