हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank च्या ग्राहकांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरेल. कारण आता ग्राहकांना बँकेच्या ‘Golden Years FD’ या स्पेशल एफडी या योजनेचा लाभ फक्त उद्यापर्यंत (7 ऑक्टोबर 2022) पर्यंत घेऊ येईल. हे लक्षात घ्या कि, ग्राहकांना या योजनेमध्ये सामान्य एफडीपेक्षा जास्त व्याज दे दिले जात आहे. ICICI Bank कडून 7 दिवस ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 3% ते 6.10% व्याज दर देते. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी या कालावधीसाठी 3.50% ते 6.6% पर्यंत व्याजदर दिला जातो.
मे 2020 मध्ये सुरू करण्यात आली Golden Years FD Scheme
ज्येष्ठ नागरिकांचे हित लक्षात घेऊन बँकेकडून ही योजना सुरू करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज दर दिला जातो. सध्या, ICICI Bank ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 50 बेसिस पॉइंट्सने व्याज देते. मात्र Golden Years FD योजनेमध्ये त्यापेक्षा 10 बेसिस पॉइंट्स जास्त व्याज दिले जाते. मात्र ही योजना फक्त 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरच लागू असेल.
ICICI Bank ने याबाबत सांगितले की, Golden Years FD वरील नवीन दर दोन्ही प्रकारच्या स्कीमसाठी उपलब्ध असतील. यामध्ये नव्याने उघडलेल्या एफडीवर आणि जुन्या एफडीचे रिन्यूअल करताना ज्येष्ठ नागरिकांना 6.6% व्याज दिले जाईल. त्यामुळे हे स्पेशल एफडी खाते उघडता येते किंवा जुन्या फिक्स्ड डिपॉझिट्सच्या खात्याचे 7 ऑक्टोबरपर्यंत रिन्यूअल करता येईल.
यासाठीचे नियम जाणून घ्या
योजनेंतर्गत FD वर मुदतपूर्व पैसे काढण्याच्या बाबत ICICI Bank ने सांगितले की, ही फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये 5 वर्ष 1 दिवसानंतर किंवा यानंतर मुदतपूर्व काढली/बंद झाली, तर लागू होणारा पेनल्टी दर 1.10% असेल. तसेच या योजनेमधील डिपॉझिट्स हे 5 वर्ष 1 दिवस आधी मुदतपूर्व काढले गेले/बंद केले गेले, प्रचलित मुदतपूर्व पैसे काढण्याची पॉलिसी लागू होईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/Personal-Banking/account-deposit/fixed-deposit/index.page
हे पण वाचा :
‘या’ 5 Multibagger Stocks ने गुंतवणूकदारांना अल्पावधीतच मिळवून दिला मोठा नफा
PNB च्या ‘या’ स्पेशल ऑफर अंर्तगत ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 6.60% रिटर्न !!!
PNB ने सुरू केली WhatsApp बँकिंग सर्व्हिस, आता घरबसल्या एकाच मेसेजद्वारे करता येणार ‘ही’ कामे
SOVA Trojan : सावधान !!! जर आपल्या फोनमध्ये आला असेल ‘हा’ व्हायरस तर …
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे दर तपासा