हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका लक्षात घेता आयसीएसई बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. आयसीएसई दहावीची परीक्षा ३० मार्चला तर बारावीची परीक्षा ३१ मार्चला संपणार होती. मात्र आता १९ ते ३१ मार्च या कालावधीतले पेपर लांबणीवर पडले आहेत. आयसीएसई बोर्डाचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गेरी अराथून यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
दरम्यान, एमएचआरडी, सीबीएसई आणि नॅशनल टेस्ट एजन्सीने सर्व परीक्षा ३१ मार्च पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय बुधवारी १८ मार्च रोजी घेतला. या पार्श्वभूमीवर आयसीएसई बोर्डाने हा निर्णय घेतला. परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. आयसीएसई बोर्डाच्या सर्व शाळांनी विद्यार्थी – पालकांनी ही माहिती सूचित करावी असे आवाहन बोर्डाने केले आहे. ज्या विषयांच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्यांची पेपर तपासणी शिक्षक घरातूनच करणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
या बातम्याही वाचा –
रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई! आकारला दंड
लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..
धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ वर! कोणत्या महापालिका क्षेत्रात किती रुग्ण पहा..
मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा