हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDBI Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील IDBI Bank ने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कारण आता बँकेकडून आता मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 20 बेस पॉइंट्सने वाढ केली गेली आहे. तसेच आता MCLR वाढल्याने होम,ऑटो आणि पर्सनल लोन महागणार आहे. रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक बँकांनी MCLR वाढवला आहे.
IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन MCLR दर 12 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहेत. MCLR मधील या वाढीचा थेट परिणाम आपल्या कर्जावर होणार आहे, कारण यामुळे आपल्या EMI मध्येही वाढ होणार आहे.
IDBI Bank चे नवीन MCLR दर
IDBI Bank ने ओव्हरनाईट MCLR रेट 7.65% पर्यंत वाढवला आहे. त्याचप्रमाणे आता एका महिन्याच्या MCLR साठी 7.80%, 3 महिन्यांसाठी 8.10% आणि 6 महिन्यांच्या MCLR साठी 8.30%,तसेच 1 वर्षाच्या MCLR साठी 8.40%, 2-वर्ष MCLR साठी 9% आणि 3-वर्ष MCLR साठी 9.40% निश्चित केला आहे.
जास्त EMI द्यावा लागणार
MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.
RBI ने रेपो दरात केली वाढ
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
MCLR काय असते ???
MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. IDBI Bank
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.idbibank.in/interest-rates.aspx
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे