मुंबई पोलिसांची आयडियाची कल्पना..! कोरोनाविषयक जनजागृतीसाठी तयार केले बॉलिवूड कलाकारांचे मीम्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दररोज दिवसाला हजारो रुग्णांचे मृत्यू होत आहेत. अश्या ह्या भयावह परिस्थितीत लोकांमध्ये धास्तीचे वातावरण तयार झाले आहे. याकरिता मुंबई पोलिसांनी मात्र कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी लोकांचे सक्षमीकरण करण्याचा वसा घेतलेला दिसतोय. जगातील कमीतकमी ७५% लोक आपल्या आवडत्या कलाकाराला फॉलो करतात. याच पार्शवभूमीवर मुंबई पोलिसांनी कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी एक अनोखी युक्ती लढवली आहे. #BeBollyGood या नावाने त्यांनी अनोखी, हटके आणि एक जबरदस्त मोहिम सुरु केली आहे.

https://www.instagram.com/p/CPHydDWFNIN/?utm_source=ig_web_copy_link

या मोहिमेच्या अंतर्गत मुंबई पोलिसांनी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या पोस्टरच्या माध्यमातून लोकांना कोरोनाविषयक नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हे फोटोज पोस्ट करण्यात आले आहेत. एकप्रकारचे हे नवे मीम्स सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.

https://www.instagram.com/p/CPHr5rUFXHy/?utm_source=ig_web_copy_link

बॉलिवूड अभिनेता राजेश खन्ना यांच्या नावावर केलेला प्रयोग तर अनेकांना भावला आहे. लोकांनी या मोहिमेची री ओढत या फोटोंवर अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडला आहे. काहींनी ‘अनुपम तुम घर से निकले तो तुम्हारी खैर नही है’ असेही एक वाक्य तयार केले आहे. या मिम्ससोबत हे वाक्यही अत्यंत जोरदार वायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CPI9kUzlO7V/?utm_source=ig_web_copy_link

आयुष्मान खुरानाच्या नावावरून तयार करण्यात आलेले मीम बघितल्यावर तर कुणालाच हसू आवरता येणे काही नाही. आयुष्मानला स्वत:लासुद्धा हे मीम प्रचंड आवडले आहे. त्याने ‘शहर के सारे विक्की डोनर प्लीज मुंबई पुलिस की बात सुनिए और बाहर जाने की बेवकुफिया न करो, आपको काफी समय मिलेगा अपनी प्यारी बिंदू से बात करने के लिएI

https://www.instagram.com/p/CPIQ2ntl5rQ/?utm_source=ig_web_copy_link

अभी टाईम नही है की हम नौटंकी साला बने और रिस्क लेI फिलहाल शुभमंगल और ज्यादा सावधानI अशी हटके कमेंट केली आहे. तर यामध्ये अमिताभ बच्चन आणि कल्की कोचलीनचेही भन्नाट मीम तयार करण्यात आले आहे. सध्या हे मिम्स प्रचंड वेगाने वायरल होत आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या या मोहिमेला नक्कीच यश मिळेल, असे वाटते आहे.

https://www.instagram.com/p/CPJBoO2F55X/?utm_source=ig_web_copy_link

Leave a Comment