हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत झालेल्या अनेक भागातील हिंसाचाराबाबत आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ”आम आदमी पक्षाचा कोणताही नेता जर या दंगलीत सामील झालेला आढळला असेल तर त्याला दुप्पट शिक्षा द्या. आम आदमी पक्षाचे (आप) नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यावर दिल्ली हिंसाचारात सामील असल्याचा आरोपाचा सामना करावा लागला आहे. या हिंसाचारात मारल्या गेलेल्या इंटेलिजेंस ब्युरोचा कर्मचारी अंकित शर्मा याच्या कुटुंबीयांनी ताहिर हुसेन यांच्यावर खून केल्याचा आरोप केला आहे. २५ फेब्रुवारी रोजी चांदबाग येथील ताहीर यांच्या घराहून लोकांवर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोपही यांच्यावर होत आहे. मात्र, समोर आलेल्या एका व्हिडिओत ताहीर यांच्या घराच्या छतावर भरपूर दगड आणि पेट्रोल बॉम्ब आढळून आले आहेत.
देश की सुरक्षा के साथ कोई राजनीति नहीं होनी चाहिए। दंगा भड़काने में जो भी दोषी पाया जाए उसे सख्त सज़ा दो। pic.twitter.com/Cnr5qffrXb
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 27, 2020
ये छत आप पार्षद ताहिर हुसैन की है,चाँदबाग जहां दंगा हुआ pic.twitter.com/mVGedYRheg
— Mukesh singh sengar (@mukeshmukeshs) February 27, 2020
दरम्यान,आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी दंगलीतील पीडितांना नुकसान भरपाई जाहीर केली. दिल्ली सरकारने पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी मदत योजना आखली आहे. दिल्ली सरकारच्या वतीनं मृतांच्या कटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई देण्यात येईल. तसेच गंभीर जखमींना २-२ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.तसेच दंगलीत ज्यांची आपली घरे जाळली गेली आहेत त्यांना ५ लाख रुपये दिले जातील. याचसोबत दिव्यांग झालेल्या लोकांना सुद्धा समान रक्कम देण्याची घोषणा केली आहे.दिल्ली हिंसाचारात मृत्य पावलेल्या अल्पवयीन मुलांच्या कुटुंबियांना सुद्धा ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितलं.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.