कडक निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर..गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दिले ‘हे’ आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशांवर कारवाई करुन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज पोलीस विभागाला केल्या.

गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विभागीय परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सूचना केल्या.
पोलीसही बाधित होत आहेत, या बाधित पोलीसांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कोविड सेंटर सुरु करा. श्री. देसाई पुढे म्हणाले, यासाठी स्थानिक आमदारांची मदत घ्या.

तसेच जिल्हा नियोजनमधूनही निधी देण्यात येईल. बाजारपेठांमधील गर्दी हटविण्याचे काम पोलीस करीत आहेत. त्यांना महानगर पालिकांचे कर्मचारी, नगर परिषदांचे कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment