शरद पवार आज मुख्यमंत्री असते तर…; यशोमती ठाकूर यांचे मोठं विधान

sharad pawar yashomati thakur
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळे असते, असे वक्तव्य काँग्रेस नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. अमरावतीमधील छत्रपती शिवाजी महारज प्रेक्षागृहाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतेच, परंतु आज काळाची गरज आहे. ते आपल्या सोबत आहेत, त्यांचे मार्गदर्शन आपल्याला आहे त्यामुळे कोणी कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र हा स्थिरच राहणार, असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

पवार साहेबांच्या घरावर परवा मोठा हल्ला झाला. त्यामुळे ते येणार नाही अशी चर्चा होती. मात्र, तरीही आपण आलात, तुम्ही भीत कसे नाही? थकत कसे नाही? आमच्या चारपट वयाचे आहात? तरी तुम्ही थकत कसे नाही, असे त्या पवारांना म्हणाल्या, भाऊसाहेबही असेच जगले, ती आठवण त्यांनी सांगितली.