…तर तेजस्वी यादव शरद पवारांचा ‘हा’ विक्रम मोडू शकतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात राजदचे युवा तडफदार नेते तेजस्वी यादव यांनी महाआघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तेजस्वी यादव यांनी बिहार निवडणुकीत विक्रमी 247 प्रचारसभा घेतल्या. तेजस्वी यादव यांच्या झंझावाती प्रचारामुळं महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.एक्झिट पोलच्या अदांजानुसार महाआघाडीची सत्ता आली तर तेजस्वी यादव बिहारचे आणि भारतातील एखाद्या राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरणार आहेत.

एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर तेजस्वी यादव देशातले सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरतील. प्रफुल्लकुमार महंतो वयाच्या 34 व्या वर्षी आसामचे मुख्यमंत्री झाले होते. नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला 38 व्या वर्षी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव 38 व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते.

तेजस्वी यादव यांनी बिहार निवडणुकीत विक्रमी 247 प्रचारसभा घेतल्या आहेत. तेजस्वी यादव यांचा आज 31 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त RJDच्या कार्यकर्त्यांनी बिहारमध्ये अनेक ठिकाणी पोस्टर लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment