व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज घराण्याचं रक्त असले तर MIDC कोरेगावला नेवून दाखवा : आ. जयकुमार गोरे

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

म्हसवडला होणारी एमआयडीसी कोरेगावला स्थलांतरीत झाली आहे आणि माणचे आ. जयकुमार गोरे यांच्या निष्क्रियतेमुळेच हे घडल्याचा आरोप होत असताना रामराजेंनी कोरेगावला एमआयडिसी का व्हावी, हे समजवुन सांगण्यासाठी एक बैठक कोरेगाव मध्ये बोलावली होती. या बैठकीत रामराजेंना कडाडुन विरोध झाला. या विरोधाचं खापर रामराजेंनी आ. जयकुमार गोरे यांच्यावर फोडलं होतं. या नंतर दोन्ही नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

रामराजेंच वय झालय त्यामुळे त्यांच्या बुद्धीवर त्यांच संतुलन राहिलं नाही. यामुळेच ते काही ही वक्तव्य करत असल्याचा गंभीर आरोप जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर केलाय. म्हसवडला मंजुर झालेली एमआयडीसी याच ठिकाणी होईल अशी चर्चा सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत झाली असल्याचं गोरेंनी सांगितल आहे.

तर कोरेगाव ज्या भागात एमआयडीसी होणार असं सांगितलं जात होतं त्याच गावांना समजवायला गेलेल्या रामराजेंना विरोध केरण्यात आला. जयकुमार गोरेंच्यात धमक असेल तर कोरेगावची एमआयडीसी म्हसवडला नेवुन दाखवावी असं चॅलेंज रामराजेंनी केलं होतं. याच चॅलेंज ला गोरेंनी त्यांच्या भाषेत उत्तर देत रामराजेंच्यात राज घराण्याचं रक्त असेल तर म्हसवडला मंजुर झालेली एमआयडीसी कोरेगावला नेवुन दाखवा असं खुल‌ं आव्हानच रामराजेंना दिल आहे.  तसंच कोरेगाव साठी एमआयडिसी चा वेगळा प्रस्ताव तयार करण्यात यावा असं सुद्धा जयकुमार गोरे म्हणाले आहेत. यामुळे म्हसवडला होणारी एमआयडिसी याचं नक्की होणार तरी काय असा प्रश्न आता सर्वसामान्य माणसांना पडू लागलाय.