“दारूत पाणी मिसळून प्यायल्यास औषध बनतं…” चक्क शिक्षणमंत्र्यांनी सांगितले दारू पिण्याचे फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राजकीय नेते भरसभेत कधी कधी अनेक वादग्रस्त वक्तव्य करत असतात. सध्या अशाच एका शिक्षण मंत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिक्षणमंत्री अनेक शैक्षणिक कार्यक्रमात हजेरी लावून शिक्षणाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये शिक्षणमंत्री चक्क दारू पिण्याच्या टिप्स (many benefits attached to alcohol) लोकांसोबत शेअर करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ छत्तीसगडमधील आहे. या व्हिडीओमध्ये छत्तीसगडचे शिक्षणमंत्री प्रेमसाई सिंग टेकम दिसून येत आहेत. हे मंत्री महोदय एका नशा मुक्तीवर आधारित एका कार्यक्रमात आले होते. यावेळी ते लोकांना दारू पिण्याचा फॉर्म्युला (many benefits attached to alcohol) सांगिताना दिसून आले आहे. शिक्षणमंत्र्यांचा हा फॉर्म्युला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ग्लासमध्ये पाणी आणि अल्कोहोलचे प्रमाण असावे, असे त्यांनी भर कार्यक्रमात (many benefits attached to alcohol) सांगितले.

काय म्हणाले शिक्षणमंत्री प्रेमसाई सिंग टेकम ?
“लोक दारू आणि त्याच्याशी संबंधित हानीबद्दल बोलतात, परंतु त्याच्याशी संबंधित अनेक फायद्यांबद्दल (many benefits attached to alcohol) कोणीही बोलत नाही. तसंच जेव्हा आपण दारूबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला ते पिण्याची योग्य पद्धत लक्षात ठेवली पाहिजे. पाण्यामध्ये योग्य प्रमाणात दारू मिसळली पाहिजे”. शिक्षणमंत्र्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शाळकरी मुलांसमोर दारूचे फायदे सांगणाऱ्या या शिक्षणमंत्र्यांवर लोकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; JCBच्या साहाय्याने नागरिकांचे रेस्क्यू
विचारांचा वारसा परफेक्ट ‘क्लिक’; राज ठाकरे- एकनाथ शिंदें भेटीवर मनसेचं सूचक ट्विट
Facebook वरील पोस्ट एडिट, डिलीट किंवा रिस्टोअर कशी करावी ???
चोरी करून स्विच ऑफ केलेल्या फोनचे ‘या’ App द्वारे कळेल लोकेशन
5 सप्टेंबरपर्यंत मिळणार PM Kisan योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे !!!