असे झाल्यास धोनीसाठी ‘टीम इंडिया’ चे दरवाजे होतील बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जुलै २०१९ पासून क्रिकेटपासून दूर आहे. विश्वचषकातील पराभवानंतर केवळ CSKच्या IPLआधीच्या सराव सत्रात त्याने बॅट हाती घेतली होती. पण करोनामुळे IPL लांबणीवर पडले. त्यामुळे धोनीचे पुनरागमन पुन्हा एकदा लांबले. आता टी-२० विश्वचषक रद्द झाल्याने IPLचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात धोनी क्रिकेटच्या मैदानावर दिसेल हे नक्की. पण त्याआधी माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डीन जोन्स याने धोनीच्या टीम इंडियातील पुनरागमनाबद्दल एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.

टीम इंडियाची निवड समिती सध्यातरी ऋषभ पंत आणि लोकेश राहुल या दोघांबद्दलच विचार करत असेल. जर धोनीची IPL 2020 मधील कामगिरी दमदार असली तरच धोनीसाठी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. पण जर धोनी IPLमध्ये आपली चमक दाखवू शकला नाही तर मात्र धोनीला ‘टीम इंडिया’चे दरवाजे कायमचे बंद होतील. त्याला मिळालेली विश्रांती त्याच्यासाठी लाभदायक ठरू शकते. पण मला विचाराल तर दीर्घ विश्रांतीनंतर संघात स्थान मिळवणं खूप कठीण असतं”, असे डीन जोन्स म्हणाला.

दरम्यान, IPLच्या आगामी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल BCCI अंतिम निर्णयापर्यंत पोहचलं असून १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment