जर तुमचीही SBI मध्ये FD असेल तर आता घरबसल्या अशाप्रकारे डाउनलोड करा इंटरेस्ट सर्टिफिकेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ऑनलाइन बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांना आणखी एक सुविधा दिली आहे. ज्याद्वारे ते आता घरबसल्या आपल्या फिक्स्ड डिपॉझिटचे (FD) इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळवू शकतील. हे SBI Quick आणि SBI च्या ऑनलाइन बँकिंग सर्व्हिसेसद्वारे केले जाऊ शकते. SBI ने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

बँकेने ट्विट करून ही माहिती दिली आहे
बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, FD इंटरेस्ट सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी फक्त ‘या’ 4 स्टेप्स फॉलो करा.

>> SBI Quick App उघडा आणि ‘विदआउट लॉग इन सेक्शन’ वर जा.
>> आता Account Services वर जा.
>> ‘डिपॉझिट इंटरेस्ट’ वर क्लिक करा.
>> तुमचे डिटेल्स टाकून तुमचा पासवर्ड सेट करा.
>> यानंतर डिपॉझिट इंटरेस्ट सर्टिफिकेट तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर येईल.

डोअरस्टेप बँकिंग सुविधा देते
SBI आपल्या ग्राहकांना डोअरस्टेप बँकिंगची सुविधा देखील देते. SBI च्या डोअरस्टेप बँकिंग सर्व्हिस मोबाईल एप, YONO, वेब पोर्टल आणि कॉल सेंटरद्वारे ऍक्सेस करता येते. याशिवाय कामाच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत टोल फ्री क्रमांक 1800111103 वर कॉल करता येईल.

‘या’ सुविधा उपलब्ध आहेत
SBI डोअरस्टेप बँकिंग सर्व्हिसेसमध्ये कॅश पिकअप, कॅश डिलिव्हरी, चेक पिकअप, चेक रिक्विझिशन-स्लिप कलेक्शन, फॉर्म 15H पिकअप, ड्राफ्ट डिलिव्हरी, लाइफ सर्टिफिकेट पिकअप, KYC डॉक्युमेंट पिकअप यांचा समावेश आहे.

Leave a Comment