दूध आवडत नसल्यास ‘अश्या’ पद्धतीने करा सेवन

benefits of drinking milk
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या आहारात दुधाचा समावेश करणे गरजचे आहे. दुधामध्ये प्रोटिन्स चे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे आपली हाडे आणि आपले शरीर बळकट राहण्यासाठी दुधाचा समावेश करणे गरजेचे राहते. लहान मुलांना दूध प्यायला आवडत नाही. पण त्यांच्या आहारात दूध ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरायला पाहिजेत. बाहेर मिळणारे दूध हे अजिबात चागले नसते. त्यापासून कोणत्याही प्रकारचे पौष्टिक घटक आपल्या मुलांना मिळत नाहीत त्यामुळे बाहेरच्या म्हणजे पिशवीतल्या दुधाचं समावेश हा आपल्या आहारात करू नये.

दुधाचे पेय कसे बनवावे— .

दुधा बरोबर खजुर आणि खारीक यांचा उपयोग:— दूध हे आपल्या जीवनातील महत्वाचा घटक आहे. दुधामुळे आपले शरीर आणि सौदर्य सुंदर राहण्यास मदत होते. खजुरमध्ये शरीराला आवश्यक असे लोह आणि खनिज तत्व मोठ्या प्रमाणात असतात. त्याच्या साह्याने दूध बनवले तर लहान मुले दूध अतिशय आवडीने खातात.

दुधा बरोबर मल्टिग्रेन पावडर–

लहान बाळांना दुधासोबत खीर बनवून द्यावी. ती खीर बाळ आवडीने खाते. नाचणी, बाजरी, ओट्स यांपासून अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळतात. बाजारात मिळणाऱ्या दुधाबरोबर घेण्याच्या स्प्लिमेंट्स मध्ये सहसा या मल्टिग्रेनचाच समावेश केलेला असतो.

बदाम —

लहान मुलांच्या बौद्धिक विकासाठी आपण बंडाची पावडर करून मुलांना खाऊ दिली पाहिजे. रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेल्या बदामाची पेस्ट दुधात एकजीव करून त्यात गूळ किंवा खारीक पावडर घालुन स्वादिष्ट एनर्जी ड्रिंक तयार केले जाऊ शकते.

हळद आणि दूध —

अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणजे हळद आणि दूध याचे मिश्रण एकत्र करून पिणे होय त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’