कोणतेही बटन दाबले तरी मत कमळावरच जाते ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा आरोप

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तिरूअनंतपुरम ( केरळ ) |देशामध्ये १४४ लोकसभा मतदारसंघात आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. महाराष्ट्र, आसाम, केरळ, बिहार, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगालमध्ये हे मतदान पार पडत आहे. तिरूअनंतपुरम मतदारसंघाचे खासदार आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांनी कोणतेही बटन  दाबा मत कमळाला जाते असा गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

शशी थरूर हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. तसेच हुशार बुद्धिमत्तेच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. कॉंग्रेसचे सरकार असताना ते केंद्रात मात्री देखील होते. मावळत्या लोकसभेत त्यांनी स्भागृतात उत्तम  कामगिरी देखील केली आहे. त्यांनी मतदान यंत्रावर घेतलेला आक्षेप गांभीर्याने विचार करण्यास भाग पडणारा आहे. तर तिकडे कोल्हापूर मध्ये देखील मतदान यंत्र बंद पडल्याचा प्रकार पाहण्यास मिळाला आहे.

या राज्यात एवढ्या जागी होत आहे मतदान

महाराष्ट्र १४, गुजरात २६, केरळ २०, आसाम ४, बिहार ५, छत्तीसगड ७, ओडिशा ६, उत्तर प्रदेश १०, पश्चिम बंगाल ५, गोवा २,कर्नाटक १४,  दादर नगर हवेली १, दमन दीव १, त्रिपुरा १. 

महाराष्ट्रात या जागी होत आहे मतदान  

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, सांगली, माढा, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर,  हातकणंगले