कोरोना पासून स्वत:ला वाचवायचे असेल तर सोडून द्या ‘या’ ५ सवयी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे देश लॉकडाऊन झाला आहे.कोरोनामुळे अशी माणसे अधिक संक्रमित होतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. गोरखपूर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर फिजिशियन राजेश कुमार स्पष्ट करतात की रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यावर लोक त्यांच्या खाण्यापिण्यास दोष देतात पण तसेनाही. पुढील स्लाइड्समध्ये तुम्हाला सांगीतले आहे की रोगप्रतिकारक शक्ती कशामुळे बिघडू शकते.

आपल्यावर कोणताही ताणतणाव येऊ देऊ नका. जास्त ताणामुळे तुमच्या शरीरात कॉर्टिसोल नावाचा स्टिरॉइड संप्रेरक सोडला जातो, जो तुमच्या प्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम करतो.

धूम्रपान हे शरीरासाठी हानिकारक आहे, म्हणून जर तुम्ही ते मोठ्या प्रमाणात केले तर त्याचा थेट परिणाम तुमच्या प्रतिकारशक्तीवर होईल. यामुळे कोरोनाचा धोका वाढतो.

लॉकडाऊन दरम्यान प्रत्येकजण घरातच आहे,लोक दिवसभर पलंगावर किंवा खुर्चीवर बसलेले असतात. यामुळे लोकांची हालचाल होत नाही, जे चुकीचे आहे. याचा प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. घरी राहूनही व्यायाम आणि इतर कामे केली पाहिजेत.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. लॉकडाऊन दरम्यान, दिवसभर लोक फोनवर असतात, यामुळे लोक झोपी जात नाहीत. याचा प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. घरी असंताना कृपया तुमची झोप पूर्ण घ्या.

आजकाल सोशल मीडियावर अशी अफवा पसरली आहे की जे लोक मद्यपान करतात त्यांना कोरोना विषाणूची लागण होणार नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे, आपण असे करू नये. मद्यपान थेट रोगप्रतिकारांवर परिणाम करते.

अशा परिस्थितीत आपण घरी असल्यास या पाच गोष्टींपासून दूर राहा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण

खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी

कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा