हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे उद्भवणारे संकट संपताना दिसत नाही, त्यामुळे आशियाई बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमत सोमवारी १७ वर्षाच्या नीचांकावर पोचली आहे.अमेरिकेमध्ये वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट ५.३ टक्क्यांनी घसरून २० डॉलर प्रति बॅरल आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणित ब्रेंट क्रूड ६.५ टक्क्यांनी घसरून २३ डॉलरवर आला.
कोरोना विषाणूमुळे जगभरात जवळजवळ ३३,००० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि युरोप आणि अमेरिकेमध्ये याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे.जगभरातील सरकार कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी लॉकडाउनचा अवलंब करीत आहेत आणि प्रवासी निर्बंध लागू केले गेले आहेत, ज्यामुळे कच्च्या तेलावर प्रचंड दबाव वाढला आहे.मागणी घटल्याच्या उलट, कच्च्या तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि अव्वल उत्पादक सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात किंमत युद्ध चालू आहे.
रियाधने गेल्या आठवड्यात सांगितले होते की मॉस्कोशी कोणत्याही उत्पादनातील कपातीसाठी ते संपर्कात नव्हते तर दुसरीकडे रशियाचे उप ऊर्जामंत्री म्हणाले की रशियाच्या उत्पादनांसाठी प्रति बॅरल २ डॉलर पर्यंत तेलाचे दर खराब नाहीत.संकेत मिळत आहेत कि दोहीन्ही बाजू कोणत्याही सहमतीपासून दूर आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’