का साजरा केला जातो संविधान दिवस? काय आहे याचे महत्त्व??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संविधानाचा स्वीकार ज्या दिवशी केला गेला तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून पण ओळखला जातो. १९४९ मध्ये यादिवशी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला. २६ जानेवारी १९५० पासून संविधान देशात लागू झाले.

भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.

संविधानाचे महत्त्व काय

आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो.

संविधानाची गरज काय?

संविधानाद्वारे देशातील नागरिकांमध्ये विश्वास आणि सहकार्याची भावना निर्माण केली जाते.

सरकार कसे स्थापन केले जाते? निर्णय घेण्याचा अधिकार कुणाला असेल? हे संविधानाच स्पष्ट करण्यात आलं आहे.

सरकारच्या अधिकारांची मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. तसेच नागरिकांचे अधिकार काय आहेत हे संविधानात स्पष्ट करण्यात आलं आहे.

श्रेष्ठ समाज निर्मितीसाठी लोकांच्या इच्छा, आकांक्षा संविधानात नमूद करण्यात आल्या आहेत.

You might also like