नवी दिल्ली । आपण देखील SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी आपल्या मोठ्या उपयोगाची आहे. 30 जूनपूर्वी बँकेने आपल्या ग्राहकांना पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे. पॅनकार्ड आधार कार्डशी जोडण्याची शेवटची तारीख आयकर विभागाने 30 जून 2021 निश्चित केली आहे. 30 जूनपर्यंत आपण हे न केल्यास आपले पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. याशिवाय आयकर कायद्यांतर्गत तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल.
बँकेने ट्विट केले
बँकेने ट्विट केले की, “आम्ही आमच्या ग्राहकांना कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी सल्ला देतो आहोत कि, “त्यांचा पॅन आधारशी लिंक करा आणि अविरत बँकिंग सेवेचा आनंद घ्या.”
We advise our customers to link their PAN with Aadhaar to avoid any inconvenience and continue enjoying a seamless banking service.#ImportantNotice #AadhaarLinking #Pancard #AadhaarCard pic.twitter.com/LKIBNEz7PO
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 31, 2021
लिंक करण्याची ‘ही’ सोपी प्रक्रिया आहे
इनकम टॅक्स वेबसाइटद्वारे आपण शोधू शकता की,आपला पॅन आधारशी जोडलेला आहे की नाही. यासाठी सर्व प्रथम इनकम टॅक्स वेबसाइटवर जा. आधार कार्डमध्ये दिलेले नाव, पॅन नंबर आणि आधार क्रमांक एंटर करा. आधार कार्डमध्ये जन्माच्या वर्षाचा उल्लेख असेल तरच दिलेल्या बॉक्समध्ये टिक करा. आता कॅप्चा कोड एंटर करा आणि लिंक आधारच्या बटणावर क्लिक करा. आता आपला पॅन आधारशी जोडला जाईल.
SMS पाठवून पॅनला आधारशी कसे जोडावे ?
यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर टाइप करावा लागेल- UIDPAN, त्यानंतर, 12-अंकी आधार क्रमांक आणि नंतर दहा-अंकी पॅन नंबर लिहा. आता स्टेप 1 मध्ये नमूद केलेला मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा.
निष्क्रिय पॅनला ऑपरेटिव्ह कसे बनवायचे ?
निष्क्रिय पॅन कार्ड ऑपरेटिव्ह केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला एक SMS करावा लागेल. यासाठी मेसेज बॉक्समध्ये आपल्या रजिस्टर्ड मोबाईलमधून 12 अंकी पॅन नंबर एंटर केल्यानंतर स्पेस देऊन 10 अंकी आधार नंबर एंटर करावा लागेल त्यानंतर तो आपल्याला 567678 किंवा 56161 वर SMS करावा लागेल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा