SBI ची आपल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! सूचनांचे पालन केले नाही तर होऊ शकेल मोठे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | आपले स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये म्हणजेच, एसबीआयमध्ये तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट सूचना जारी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती देताना, यूपीआय संदर्भात जास्त जागरूक राहण्याचे सांगितले आहे. तुम्हाला जर यूपीआयमधून पैसे डेबिट झाल्याचा एसएमएस आला तर तात्काळ आपले UPI बंद करून ठेवा. जेणेकरून मोठे नुकसान होणार नाही.

यूपीआयच्या माध्यमातून फ्रॉड होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याची खबरदारी स्टेट बँक ऑफ इंडियाने घेऊन त्यांच्या ग्राहकांना याबद्दल सूचित करण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या अकाउंटमधून यूपीआईच्या माध्यमातून पैसे कट झाल्याचा मेसेज आल्यानंतर, त्वरित आपल्या फोनमधून UPI अकाउंट डिॲक्टिवेट करावे. UPI डिऍक्टिव्हेट केल्याने पुढील नुकसान होणार नाही. असे एसबीआयने म्हटले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फसवणूक बंद करण्यासाठी माहिती देणारा एक मेसेज केला असल्याचे समजते. UPI बंद करण्यासाठी ग्राहक टोल फ्री क्रमांक 1800 11 109 वर कॉल करू शकतात. तसेच https://cms.onlinesbi.sbi.com/cms/ वर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकतात. सोबतच तक्रार नोंदवण्यासाठी 922 3008 333 या नंबरवर एसएमएस करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.