पाकिस्तानमध्ये खळबळ : इम्रान खानचे ‘ते’ 7 व्हिडिओ कोणत्याही क्षणी होणार व्हायरल

imran khan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एक क्रिकेटर म्हणून आपली कारकीर्द पार पडलेल्या आणि पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषविलेल्या इम्रान खान यांच्याबाबतीत एक खळबळजनक गोष्ट समोर आली आहे. त्यांचे अश्लील अवस्थेतील 7 व्हिडिओ आता पाकिस्तानी माध्यमांमधील काही पत्रकारांच्या हाती लागले आहेत. ते कोणत्याही क्षणी व्हायरल होतील, असे सांगण्यात आलेले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इम्रान खान यांचे 7 व्हिडिओ प्रसिद्ध तसेच लिक होणार असून यातील 3 व्हिडीओ हे अतिशय आक्षेपार्ह आहेत, असे पाकिस्तानी पत्रकारांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओबाबत स्वतः इम्रान खान यांनाही माहिती आहे. त्यांनी रमजान ईदपूर्वी माझ्या चारित्र्यावर घातपाताचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे म्हंटले होते.

इम्रान खानचे जे व्हिडीओ व्हायरल होणार आहेत ते एका ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. ते ठिकाण म्हणजे बनीगाला हे होय. बनिगाला हे इम्रानचे निवास्थान आहे. येथील त्यांच्या आलिशान घरात व्हिडीओ बनवले गेले आहेत. तयार करण्यात आलेले व्हिडीओ हे 2 मिनिटे 18 सेकंद इतके आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे तयार करण्यात आलेले व्हिडीओ बनावट असल्याचे सांगण्यापूर्वी आणि ते जारी करण्यापूर्वी त्याचे फॉरेन्सिक ऑडिट देखील करण्यात आले आहे.

पाकिस्तानमध्ये उडणार एकच खळबळ

इम्रान खान यांचे सात व्हिडिओ लिक झाल्यानंतर ते पाकिस्तानमध्ये खळबळ उडवून देणार हे नक्की. यातील एका व्हिडिओबाबत पाकिस्तानी पत्रकारांनी माहिती दिली असून यामध्ये काही ऑडिओ टेप देखील आहेत. यापैकी एक ऑडिओ असा आहे कि, जो इम्रान सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या शेख रशीद यांनी कारमध्ये रेकॉर्ड केला होता आणि नंतर तो लष्करप्रमुख जनरल बाजवा यांना पाठवला होता. त्यांच्या या व्हिडिओने खळबळ उडणार आहे.

काय आहे बनिगाला?

इम्रान खान यांचे जे अश्लील व्हिडीओ तयार करण्याचा दावा घेतला जातोय ते बनियाला येथील आहेत. बनियाला हे इम्रानचे एक आलिशान असे निवास्थान आहे. ते इस्लामाबादपासून 15 किमी अंतरावर आहे. या ठिकाणी इम्रान खान राहत असून ते दररोज तेथून ऑफिसपर्यंत हेलिकॉप्टरने प्रवास करत. बनीगाला हे डोंगराळ भागात अनेक एकरांवर पसरलेले आहे. गोल्फ कोर्स ते स्विमिंग पूल आणि सर्व प्रकारच्या सुविधा येथे उपलब्ध आहेत.

‘त्या’ महिलेचे गूढ उकलणार?

काही महिन्यांपूर्वी मध्यरात्री एका महिलेला चार्टर फ्लाइटने अचानक लंडनला का पाठवण्यात आले, याचे स्पष्टीकरण एका पत्रकाराने इम्रानच्या पक्ष पीटीआयच्या नेत्यांकडे मागितले. या महिलेचे पीटीआयच्या अनेक मंत्र्यांशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. ही महिला गरोदर होती आणि तिचा गर्भपात लंडनमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेचा संबंध इम्रानशी तर नाही ना हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समजणार आहे

इम्रानच्या पहिल्या पत्नीने ‘हा’ केला आहे गंभीर आरोप –

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पहिल्या पत्नी रेहम खान हिने तिच्या पुस्तकातून इम्रान व त्याच्या पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणजे इम्रान हे समलैगिक असून त्यांचे त्यांच्या पार्टीतील अनेक सदस्यांसोबत शारीरिक संबंध सुद्धा राहिलेले आहेत.