1990 मध्ये अवघ्या 2 कोटींमध्ये Infosys ला खरेदी करण्याची होती ऑफर, कंपनीची व्हॅल्यू 6.5 लाख कोटी कशी झाली ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इन्फोसिसचे (Infosys) संस्थापक एनआर नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) यांनी सांगितले की,”1990 मध्ये या कंपनीला केवळ दोन कोटी रुपयांत खरेदी करण्याची ऑफर मिळाली होती. मूर्ती आणि त्याच्या सह-संस्थापकांनी ही नाकारली आणि कंपनीतच राहण्याचा निर्णय घेतला. इन्फोसिस हा आता देशातील दुसर्‍या क्रमांकाची सॉफ्टवेअर एक्सपोर्टर कंपनी आहे आणि त्याची मार्केटकॅप 6.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीच्या संस्थापकांच्या वचनबद्धतेशिवाय आणि 1991 मध्ये झालेल्या आर्थिक सुधारणांशिवाय हे शक्य झाले नसते. या सुधारणांमुळे इन्फोसिससारख्या कंपन्यांना स्वत: साठी मार्केट शोधता आले कारण त्यांना विविध परवानग्यांसाठी सरकारवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती.

1991 मधील मोठ्या बदलांमुळे यशाचा मार्ग मोकळा झाला
देशातील आर्थिक सुधारणांच्या 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत मूर्ती यांनी 1991 मध्ये झालेल्या मोठ्या बदलांनी अचानक इन्फोसिसच्या यशाची दारे कशी उघडली हे सांगितले. मूर्ती म्हणाले की,”1991 मध्ये इन्फोसिसची साइज खूपच कमी होती. त्यामुळे कंपनीच्या आशा, महत्वाकांक्षा आणि व्याप्तीही मोठी नव्हती. कंपनीचे ऑफिस जया नगर, बंगळुरू येथे होते. आमचा बराचसा वेळ दिल्लीकडे प्रवास करून कॉम्प्युटर आणि इतर एक्सेसरीज खरेदी करण्याचा इम्पोर्ट लायसन्स मिळवण्यासाठी वाया जात असे.

को-फाउंडर्सच्या घरी फोन देखील नव्हता
कंपनीचे तरुण कर्मचारी परदेशात प्रोजेक्ट्सवर काम करण्यासाठी जात असत आणि त्यांना परकीय चलन मिळवण्यासाठी मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडे जावे लागत असे. त्या काळी कॉम्प्युटर इम्पोर्ट करण्याची प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची होती. बँकांना सॉफ्टवेअर आणि टर्म लोनची माहितीही नव्हती तसेच सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला वर्किंग कॅपिटल लोन देखील दिले जात नव्हते. मूर्ती म्हणाले की,”दहा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतरही इन्फोसिसच्या सह-संस्थापकांची आर्थिक परिस्थिती तितकीशीही चांगली नव्हती कि त्यांना घर आणि कार खरेदी करता येईल. त्यावेळी त्यांच्या घरी फोन देखील नव्हता.”

IPO बाबत इन्फोसिसचे मत काय आहे?
ते म्हणाले की,” जेव्हा कंपनीने कॉम्प्युटर इम्पोर्ट करण्यासाठीच्या लायसन्ससाठी अर्ज केला तेव्हा या प्रक्रियेस दोन ते तीन वर्षे लागली आणि अनेक वेळा दिल्लीला जावे लागले. त्या काळात अमेरिकेतील तंत्रज्ञान देखील दर सहा महिन्यांनी बदलत असत आणि इन्फोसिसला कॉम्प्युटर इम्पोर्ट करण्याचे लायसन्स मिळाल्यास 50 टक्के अधिक क्षमता आणि 30 टक्के कमी किंमतीची नवीन आवृत्ती मिळत असे.” IPO बाबत बोलताना ते म्हणाले की,”इन्फोसिसला 1991 मध्ये IPO आणायचा होता परंतु माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या, बाबरी मशीद पाडणे आणि हर्षद मेहता घोटाळा यामुळे त्यासाठी उशीर झाला.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group