२०२४ ला एकत्र लढलो तर शरद पवारांच्या रूपात मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसणार- रोहित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवारांची भूमिका सर्वात महत्वाची होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन भिन्न विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी पवारांनी आपलं राजकीय कौशल्य वापरत राज्यातील सरकार अस्तित्वात आणलं. असं तिन्ही पक्ष सरकार स्थापन झाल्यापासून सांगत आले आहेत. सध्या राज्यात सत्तास्थापनेत यश मिळालेल्या महाविकास आघाडीने २०२४ ची लोकसभा निवडणूक एकत्र लढली तर शरद पवार हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात असं शरद पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ते औरंगाबादमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमात रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या रूपात मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसू शकतो असा आशावाद बोलून दाखवला. रोहित म्हणाले कि, ”साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. लोकसभेच्या वेळी म्हणजेच २०२४ ला एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.” असा विश्वास रोहित यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले कि, ”महाराष्ट्रात सगळं राजकारण आता सोपं झालं कारण महाविकास आघाडी झाली आहे. जर लोकसभेतही आपण एकत्र लढलो तर एक मराठी माणूस पंतप्रधानपदी बसू शकतो. शरद पवार यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. पवारसाहेब जेव्हा कुठेही जातात तेव्हा सामान्य लोकांना काय पाहिजे ते ओळखून घेत असतात. साहेबांचा लोकांवर विश्वास आहे. लोकांचा साहेबांवर विश्वास आहे.” असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment