बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये एका शेतकरी कुटुंबाला गावातीलच तीन ते चार जणांनी मिळून शुल्लक कारणावरुन अमानुषपणे मारहाण (land dispute) केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मारहाणीमध्ये पीडित शेतकरी, त्याची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संबंधित घटना ही जमिनीच्या शुल्लक वादातून (land dispute) घडली आहे. ही घटना बीडच्या धारुर तालुक्यातील कोथिंबीरवाडी या ठिकाणी घडली आहे.
संतापजनक ! 'या' शुल्लक कारणावरुन शेतकरी कुटुंबाला अमानुषपणे मारहाण pic.twitter.com/nzzRMATHQc
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 29, 2022
आरोपींनी जमिनीच्या शुल्लक वादातून मागासवर्गीय कुटुंबावर लाठ्या-काठ्यांनी जीवघेणा हल्ला (land dispute) केला आहे. या मारहाणीत पती-पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आंबेजोगाई येथील स्वराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले नेमके ?
धारुर तालुक्यातील कोथिंबीरवाडी येथील शेतकरी बालासाहेब रोहिदास उजगरे काल सकाळी शेतात काम करत असताना शेजारील अजय भानुदास तिडके आणि सिद्धेश्वर भानुदास तिडके यांनी उजगरे यांच्या शेतात दगडे टाकण्यास सुरुवात केली. यावेळी उजगरे यांनी त्यांना शेतात दगड टाकू नका म्हणुन सांगितलं असता आरोपींना राग आला. यानंतर त्यांनी उजगरे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या आरोपींनी पीडितांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. या मारहाणीत बालासाहेब उजगरे, त्यांची पत्नी शकुंतला उजगरे, मुलगा निखील उजगरे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मारहाणीप्रकरणी दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये बालासाहेब उजगरे यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांवर ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
हे पण वाचा :
मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर
कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात
‘वर्दी उतार के आओ, तुम को देख लेता’
शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी
चंद्रपूरमध्ये विचित्र अपघात ! घटना CCTVमध्ये कैद