Tuesday, June 6, 2023

माझा मृत्यू झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबादच्या कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जावई हर्षवर्धन जाधव केलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. मला त्रास दिल्यास मी आत्महत्या कारेन अशी धमकी त्यांनी दानवे यांना दिली आहे. प्रापर्टीवरून वाद झाल्याचे या व्हिडिओतून वरकरणी दिसून येत आहे. या व्हिडिओतून हर्षवर्धन जाधव यांच्यावर काही आरोपही केले आहेत. मला तुमच्या मुलीशी संसार करायचा नाही असेही ते म्हणाले आहेत.

रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना हिचे पती हर्षवर्धन जाधव यांनी फेसबुकवरून एक व्हिडीओ सर्वत्र शेअर केला आहे. यामध्ये प्रॉपर्टीवरून त्यांना त्रास दिला जात असल्याचे वरकरणी दिसून येते आहे. मी हर्षवर्धन बंगला तुमच्या मुलीला देतो. पण जो प्लॉट आहे तो माझ्या वडिलांचा आहे. माझ्या आईचा आहे आणि तो माझ्या नावावर आहे जो मी देणार नाही असे ते म्हणाले आहेत. तुम्ही प्रापर्टीसाठी काहीही करू शकाल असेही ते म्हणतात. ते म्हणाले आहेत, “२०,००० कोटींची प्रॉपर्टी आहे पण १० कोटी तुम्ही सोडणार नाही मला माहित आहे.” मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर तुमचे रेकॉर्डिंग सर्वत्र व्हायरल होईल असा दमही त्यांनी दिला आहे.

हर्षवर्धन यांनी मी आता कोचीन ला जात आहे मला काही त्रास दिला तर मी सायनाईडच्या पिल्स माझ्यासोबत ठेवल्या आहेत अशी धमकी दिली आहे. तसेच माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर तुम्ही जबाबदार असाल असा इशाराही दिला. तुम्ही काहीही कराल कारण तुम्ही गुंड प्रवृत्तीचेच आहात असा आरोप त्यांनी केला आहे. तुमच्या मुलीला काही राजकीय मदत लागली तर मी करेन मात्र इथून पुढे तिच्याशी संसार मी करू शकणार नाही असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.