हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये, अस आवाहन राज्यातील खासगी डॉक्टरांना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी करोनाच्या भीतीपोटी रुग्णालयं बंद केलेत. हे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर हे देवासमान असतात. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी, आपण अशा परिस्थितीत असंवेदनशीलता दाखवली तर सामान्य जनतेनं कोणाकडे जावं? असा सवाल आरोग्यमंत्री टोपे यांनी केला.
आम्ही सर्वांना सुचित केलं आहे रूग्णालये सुरू राहतील. कोणालाही त्रास होणार नाही. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी. करोना बाजूला ठेवावा. त्याव्यतिरिक्त आणखीही आजार आहेत. अन्य आजारांच्या उपाचारांसाठी खासगी रुग्णालये सुरू रहाणे आवश्यक आहेत. गरोदर महिला,लहान मुलांचे आजार, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचाराची गरज असते. त्यामुळे राज्यभरातील खासगी डॉकटरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. काही आपात्कालिन परिस्थितीत जर कोणाला काही मदत हवी असेल तर त्यांनी कोणाकडे जावं. तेव्हा डॉक्टरांनी आपली क्लिनिक सुरू ठेवावी, असं कळकळीच आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासगी डॉक्टरांना केलं आहे.
कोरोना व्यतीरिक्तही अन्य आजारांच्या उपाचारांसाठी खासगी रुग्णालये सुरू रहाणे आवश्यक आहेत. गरोदर महिला,लहान मुलांचे आजार, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचाराची गरज असते. त्यामुळे राज्यभरातील खासगी डॉकटरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 27, 2020
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १४७ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?
महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”
भारतात या ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!
नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन