गडचिरोलीत ट्रक आणि स्कूल व्हॅनचा भीषण अपघात, 4 विद्यार्थी गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोलीमधील नवेगाव मार्गावर स्कूल व्हॅन आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव परिसरात हा दुर्दैवी अपघात घडला आहे. राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना ट्रक आणि बसमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर बस रस्त्यावर पलटली तर ट्रक दुसऱ्या बाजूला जाऊन शिरला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसमध्ये असलेले विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके ?
गडचिरोलीत नवेगाव खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना नेणारी व्हॅन पंचर झाल्यानंतर दुरुस्तीसाठी उभी होती. त्यावेळी छत्तीसगडहून भरधाव येणा-या ट्रकने या व्हॅनला जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्या चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

उभ्या व्हॅनला धडक दिल्यानं ट्रकचालकाविरोधात लोकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हि व्हॅन एका जागी उभी असल्यामुळे ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत ती पलटी झाली आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला हे अद्याप समजू शकले नाही. या अपघातानंतर रस्त्यावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment