काॅंग्रेसला जोतिबा पावला : कोल्हापूरात जयश्री जाधवांचा पोटनिवडणूकीत विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूकीत पहिल्या फेरीपासून मतमोजणीत आघाडीवर असलेल्या काॅंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी अखेरच्या फेरीअखेर 92 हजार 12  एवढी मते मिळवली आहेत. कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपाच्या सत्यजित कदम यांच्यावर 18 हजार 901 मतांनी विजय मिळवला. काॅंग्रेसचे चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर मतदार संघात पोटनिवडणूक लागली होती, त्यामध्ये पत्नी जयश्री जाधव यांनी विजय मिळविला. आज कोल्हापूरच्या जोतिबाची दोन वर्षानंतर यात्रा भरलेली असून जोतिबा कोणाला पावणार याकडे कोल्हापूरसह राज्याचे लक्ष लागले होते.

या मतदार संघातील पोटनिवडणूक कॉंग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीने कोल्हापूरची पोटनिवडणूकीत काॅंग्रेसने विजय निश्चित केला आहे. शिवसेनेबाबत भाजपाने अनेकदा अफवा पसरवल्या होत्या. कोल्हापूरचा खरा शिवसैनिक भाजपा मदत करेल असे खुद्द भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिक महाविकास आघाडी सोबत असल्याचे म्हटले होते, ते निकालावरून दिसून आले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे निकालासाठी मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. कसबा बावड्यासह कोल्हापूरात महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांच्या विजयाचे पोस्टर्स सकाळी 9 वाजता झळकण्यास सुरूवात केली होती. अखेर 12 वाजता निर्णायक आघाडीनंत कार्यकर्त्यांनी जयश्री जाधव यांच्या निवासस्थानी गुलालाची उधळण केली.

राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत 24 व्या फेरीअखेर काँग्रेसच्या श्रीमती जयश्री जाधव यांनी 18 हजार 838 मतांनी विजय निश्चित झाला. 24 व्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना 92 हजार 12 तर सत्यजित कदम यांना 73 हजार 174 मते मिळाली आहेत.

25 व्या फेरीत अखेर जयश्री जाधव यांना  94767 तर सत्यजित कदम यांना 76123 मते मिळाली. तर शेवटच्या 26 व्या फेरीत जयश्री कदम यांना 96226 तर सत्यजित कदम 77426 मते मिळाली आहेत. जयश्री कदम यांचा 18 हजार 800 मतांनी विजय मिळाला. तर पोस्टल 101 मते धरून एकूण 18901 मतांनी विजय मिळाला आहे.

आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविली : चंद्रकांत पाटील

भाजपाने विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणूक लढविली. आम्ही राज्यात 5 तर केंद्रात 7 वर्ष सत्तेत असाताना विकासकामे केली. माझ्यावर विरोधकांकडून टीका होणार, मला टीकेची सवय आहे. मतदारांनी दिलेला काैल मान्य आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

कोल्हापूर जनतेने स्वप्न पूर्ण केले म्हणत… जयश्री जाधव भावूक

विजय निश्चित आहे. अण्णा नाहीत याची मला खंत आहे. त्यांची मला पावलोपावली आठवण येईल. अण्णांच्या माघारी कोल्हापूर जनतेने त्यांचे स्वप्न पूर्ण केले. अण्णांनी जे पेरलं ते चांगलं उगवलं. असे सांगत जयश्री जाधव भावुक झाल्या. पुढे त्या म्हणल्या, कोल्हापुरच्या स्वाभिमानी जनतेने करुन दाखवले. त्यांनी मला पाठिंबा दिला. अण्णांची आठवण पदोपदी येते. त्यांनी जे कार्य केले, त्यांनी जी माणसे जोडली ती आजही माझ्याबरोबर आहेत. अण्णां नाहीत याची मला खंत आहे. अण्णांचे स्वप्न मी निश्चित पूर्ण करेन. मला जनतेने जी मते दिली त्यांची मी आभारी आहे. या यशाचे श्रेय मी महाविकास आघाडीली देते. पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझ्या जनतेलाही श्रेय देईन. कोल्हापुरच्या स्वाभिमान जनतेने मला न्याय दिला आहे. या निवडणुकीत भाजपचे संस्कार कमी पडलेत, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Comment