हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस भीतीचे वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून वेगवेगळ्या आदेशाचे पालन करण्याचा संदेश दिला जात आहे. कोरूनापासून वाचायचे असल्यास सोशल डिस्टन्स आणि मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी सुद्धा दिला आहे.
जगातील अनके देशांमध्ये कोरोनाच्या महामारीने हैराण केले आहे. लंडन मध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही. तेथील सरकारने सुद्धा मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्याच कालावधीत लंडन मध्ये रोड वर एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. शुक्रवारी शहरातील फेमस शॉपिंग स्ट्रीट वर एक मुलगा फक्त मास्क घालून फिरत होता. परंतु त्याच्या अंगावर मास्क व्यतिरिक्त कोणताही कापड नव्हता. त्याच्या निजी भागावर निळ्या कलरचा मास्क लावला होता. हे पाहून लोक हैरान झाले.
Man parades down Oxford Street wearing nothing but mask.
A naked man has been spotted walking about on Oxford Street in central London, wearing nothing but a face mask as a sort of makeshift g-string.#London #Coronavirus #WearAMask #Mask #COVID19 pic.twitter.com/gWvCjSub94
— First India (@thefirstindia) July 24, 2020
ऑक्सस्फोर्ड च्या रोड वर तो व्यक्ती निर्लज्ज पणे फिरत होता. ना कोणतं मास्क की ना सोशल डिस्टन अनके लोक त्याच्याकडे बघून हसत होते तर काही लोक त्यांचे फोटो काढत होते. तर काही लोक त्याच्याकडे किळसवाण्या नजरेने बघत आणि हसत होते. परंतु तो व्यक्ती रोड वर असा का फिरत होता याच कारण मात्र अद्याप समजलं नाही.
काही युरोपियन देशांमध्ये मास्क वापरणे अनिर्वाय केलं आहे. शुक्रवारी युनाटेड किंग्डम मध्ये मास्क वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ब्रिटन मध्ये कोरिनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी तर मास्क हवंच आहे . दुकानं तसेच बँक मध्ये मास्क शिवाय परवानगी मिळणार नाही असा आदेश काढला आहे. जे लोक सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणार नाहीत अश्यांना 100 पौंड चा दंड बसवला जाणार आहे.
जगभरात 1,57,36,499 लोक संक्रमित झाले आहेत. त्यातील आत्तापर्यंत 6 लाख 39 हजार लोकांचे प्राण गेले आहेत. भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढून ती 13 लाख पर्यंत गेली आहे. 8 लाख लोक बरे झाले आहेत तर 4 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 31 हजार 358 लोकांचा जीव गेला आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in