हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना व नारायण राणे यांच्यातील वाद हा सर्वपरिचित आहे. सध्या भाजपनेते तथा कॅबिनेटमंत्री नारायण राणे व संजय राऊत यांच्यात एकमेकांवर टीका केली जात आहे. आज राणे विरुद्ध राऊत असा वाद पुन्हा रंगला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केल्यानंतर त्यांना खासदार संजय राऊतांनाचीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आम्ही सभ्यपणा पाळतोय, पण कुंडल्या आमच्याकडेही आहेत, आम्ही देखील संदूक उघडू शकतो हे लक्षात ठेवा,” असा इशारा राऊतांनी दिला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजपासून नाशिक दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, “नारायण राणे म्हणतात की, तुमच्या कुंडल्या काढू, मग आम्ही त्यांना विचारतो, तुम्हाला कुंडल्या नाहीत का…? आम्ही तुमचे संदुक उघडले तर काय बाहेर पडेल हे लक्षात ठेवा. त्यामुळे राणे तुम्ही बोलताना जरा जपून बोलावे.”
राणेंवर टीका करताना राऊत म्हणाले की, “आजपर्यंत अनेकजण शिवसेनेत आले गेले. त्यांनी आपले स्थान निर्माण केले. नंतर त्यांनी शिवसेना सोडली, पण यांच्यासारखा उतमात कुणी केला नाही. “जठार छत्रपती संभाजी महाराजांची राणेंशी तुलना करतात. ज्यांनी राणेंच्या विरोधात आयुष्य घालवले. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे कि, वेडेवाकडे काही केले तर सोडणार नाही, हि गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी, असा इशारा यावेळी राऊतांनी दिला.