उस्मानाबाद प्रतिनिधी | राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करण्याचे लोण थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातेवाईक आमदार राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. राणा जगजितसिंह पाटील यांनी या संदर्भात कसलाच निर्वाळा दिला नसला तरी त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मनाला जातो आहे.
राणाजगजितसिंह पाटील हे पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राणाजगजितसिंह पाटील यांच्या सख्या आत्या आहेत. त्यामुळे शरद पवार यांचे राणाजगजितसिंह पाटील हे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने ओमराजे निंबाळकर यांचे नाव जाहीर करताच शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव जाहिर केले. ओमराजे आणि राणाजगजितिसंह यांच्यात लोकसभा निवडणुकीला लढत तर चांगली झाली मात्र ओमराजेंनी या निवडणुकीत बाजी मारली. लोकसभेला झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेला होऊ नये म्हणून राणा भाजपमध्ये दाखल होणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान रणाजगजीतसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाला उस्मानाबादच्या स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनाचा विरोध आहे असे देखील चित्र आहे. मात्र पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा अंतिम मानून काम करणारा पक्ष असणाऱ्या भाजपमध्ये स्थानिक विरोधाला जुमानले जाईलच असे नाही. त्यामुळे कदाचित उद्याच राजाजगजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करतील.
विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF
WhatsApp Nambar – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur
चार दिवस कोठे होतात असा सवाल करत मंत्री देशमुख, महाजनांना पूरग्रस्तांनी घेरले
गिरीश महाजनांच्या पूर पर्यटनाचा विरोधांसोबत नेटकऱ्यांनी घेतला खरपूसर समाचार
शिवस्वराज्य यात्रेच्या मंचावरच अमोल कोल्हेंना विचारला जाब ; राष्ट्रवादीच्या नेत्यांची उडाली धांदल
सेना भाजप युती रवी राणांच्या विजयाचा ठरणार मुख्य अडथळा
विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंवरआरोप करत आहेत : सुरेश धस