सांगली | जिल्ह्यात कोरोनाची लाट कमी होत असताना गुरुवारी पुन्हा हजारावर रुग्णसंख्या गेली. नवे रुग्ण 1 हजार 13 रुग्ण आढळले, आठ हजाराहून अधिक चाचण्या केल्याने रुग्णवाढ झाली. मात्र पॉझिटिव्हीटी दर 12.75 टक्के राहिला. तर 27 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1064 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका नवे 137 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 18, कडेगाव 85, खानापूर 83, पलूस 37, तासगाव 71, जत 73, कवठेमहांकाळ 67, मिरज 127, शिराळा 109 आणि वाळवा तालुक्यात 206 रुग्ण आढळले. तसेच म्युकरमायकोसिसचे नवे 8 रुग्ण आढळले.
कोरोनाची रुग्ण संख्या कमी करण्यासाठी चाचण्या वाढवण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून सरासरी साडेपाच हजारावरुन आठ हजारावर नेण्यात आल्या. गुरुवारी कोरोना संशयित जिल्ह्यातील 8 हजार 172 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या 2516 पैकी 381 बधित तर 5656 अँन्टीजेन चाचणीमध्ये 661 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून 1013 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यानुसार पॉझिटिव्हीटी रेट 12.75 टक्क्यांपर्यंत खाली आला. जिल्ह्यातील 27 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर 4, मिरज शहर 1, तासगाव व वाळवा तालुक्यातील 5, मिरज 4, खानापूर 3, कडेगाव, पलूस तालुक्यात प्रत्येकी 2 व जत तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
महानगरपालिका क्षेत्रात नव्याने 137 रुग्ण आढळून आले. सांगली शहरात 99 तर मिरज शहरात 38 रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात 18, कडेगाव 85, खानापूर 83, पलूस 37, तासगाव 71, जत 73, कवठेमहांकाळ 67, मिरज 127, शिराळा 109 आणि वाळवा तालुक्यात 206 रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच म्युकरमायकोसिसचे नवे 8 रुग्ण आढळले. आजपर्यंत म्युकरमायकोसीसचे 200 रुग्ण आढळून आले. तर दहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 1 लाख 21 हजार 282 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 3 हजार 507 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 1 लाख 6 हजार 846 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 10 हजार 929 रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी 8 हजार 668 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.