हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण देशभरात कोरोनाने कहर केला आहे. अश्यावेळी लोक हतबल होऊन प्रत्येकाकडे मदतीच्या आशेने पाहू लागले आहेत. दरम्यान अनेक लोक स्वखुशीने सढळहस्ते मदत करताना दिसत आहेत. यामध्ये अनेक सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. दरम्यान आता अभिनेते अनुपम खेरदेखील मदतीसाठी पुढे आले आहेत. अनुपम खेर फाउंडेशनने डॉ. आशुतोष तिवारी (ग्लोबल कैंसर फाउंडेशन, यूएसए) आणि बाबा कल्याणी (भारत फोर्ज, इंडिया) यांच्यासोबत मिळून नुकतीच ‘प्रोजेक्ट हील इंडिया’ नामक योजनेस सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. याचे मुख्य उद्देश्य असे कि, या कठीण काळात देशभरात कोविड-१९ च्या विरुद्धच्या सुरु असलेल्या लढाईत मदत करणे.
https://www.instagram.com/tv/COuEm_kFkEj/?utm_source=ig_web_copy_link
कोरोनामुळे देशातील सद्य परिस्थिती पाहता लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अश्यावेळी एक मदतीची आशा देखील जगण्यासाठी उमेद देत असते. लोकांसाठी हि योजना उमेद होऊन आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘प्रोजेक्ट हील इंडिया’ या योजनेअंतर्गत, अनुपम खेर फाउंडेशन ही संस्था संपूर्ण भारतात गरजू संस्थांना आणि रुग्णालयांना महत्वपूर्ण उपकरणे आणि इतर लाइफ सपोर्टिंग साधने उपलब्ध करून देणार आहेत. क्रॉसवेंट वेंटिलेटर (आईसीयु क्रिटिकल केयर), मेडट्रोनिक वेंटिलेटर, रेसमेड नॉन-इनवेसिव वेंटिलेशन डिवाइस आणि ऑक्सीजन कंसंट्रेटर्सची पहिली तुकडी या आठवड्या दरम्यान भारतात येईल अशी आशा आहे.
https://www.instagram.com/p/COvfj3vM1ln/?utm_source=ig_web_copy_link
याविषयी बोलताना अनुपम खेर म्हणाले की, “या वैश्विक संकटात, आपण माणूस म्हणून नेहमीच सामूहिक रुपात कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी एकत्रितपणे सरसावलो आहोत. भारत मोठ्या संकटातून जात आहे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण आपले कर्तव्य पार पाडावे. जगभरात असंख्य लोकांच्या मदत करण्याच्या पद्धतींबद्दल चौकशी केली मात्र, डॉ. आशुतोष तिवारी एका ठोस योजनेसोबत पुढे येणारे पाहिलेच होते. यातून मला या देशाला पुढे नेण्याची आणि आपल्या देशाची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली.
https://www.instagram.com/p/COxLBVGMnPz/?utm_source=ig_web_copy_link
हे सर्व काही माननीय बाबा कल्याणी आणि डॉ आशुतोष तिवारी यांच्यासारख्या मानवतावादी लोकांमुळे आहे जे जगाला उत्तम बनवण्यासाठी मदत करतात आणि मानवतेवरील आपला विश्वास अधिक ठाम बनवतात. त्यांच्यासोबत जोडले जाणे हा मी माझा स्वत:चा गौरव समजतो आणि याचा मला आनंद आहे.” यासोबतच, ‘प्रोजेक्ट हील इंडिया’द्वारे आपल्या लोकांची आणि आपल्या समाजाची मदत करण्यासाठी निधी, औषधे आणि इतर अत्यावश्यक संसाधने पुरवण्यात येणार आहेत.