Tuesday, January 31, 2023

कृष्णा नदीपात्रात पूराच्या पाण्यात आरळे- वडूथ येथील हुल्लडबाज युवकांच्या उड्या

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. या वाहणाऱ्या कृष्णा नदीत पात्रात वडूथ- आरळे येथे जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात हुल्लडबाज युवकांनी उड्या घेतल्या आहेत. युवकांच्या या कृत्याकडे दुर्लक्ष न करता कारवाई करण्याची मागणी होत आहे. अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास एखाद्याचा जीव जावू शकतो, तेव्हा प्रशासन कारवाई करणार का?

- Advertisement -

सातारा शहराजवळ असणाऱ्या वडूथ- आरळे गावच्या ठिकाणी कृष्णा नदीकाठी शकुंतला ईश्वराचा प्रसिद्ध मंदिर आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीला मोठा पूर येतो. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पात्राचे पाणी वाढले आहे. पाणी अत्यंत वेगाने वाहत असून वडूथ – आरळे येथील काही युवक आपल्या जिवाची पर्वा न करता शकुंतला ईश्वराच्या मंदिरावर उड्या टाकून पोहताना दिसत आहेत, हे अत्यंत घातक धोक्याचे आहे.

पावसाचा जोर वाढल्याने धरणेही भरू लागली आहेत. त्यातच नदीपात्राबाहेर पाणी आलेले आहे, अशावेळी धरणातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीनी राैद्ररूप धारण केलेले असताना युवक बेजाबदारपणे पूराच्या पाण्यात उड्या घेत आहेत. या युवकांच्या वेड्या धाडसामुळे एखाद्याचा जीव जावू शकतो. तेव्हा या हुल्लडबाज युवकांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.