हँलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशात भाजपने मोठा आघाडी घेतली आहे. समाजवादी पार्टीनेही 105 जागांवर आघाडी घेतली आहे. काॅंग्रेस आणि बसपाला मोठा धक्का बसलेला आहे.
उत्तर प्रदेशात 279 जागाचे कल सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हाती आले. त्यामध्ये भाजपा 152 , समाजवादी पक्ष 115, बसपा 7, काॅंग्रेस 2 व इतर 3 जागेवर आघाडीवर होते. भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार योगी आदित्यनाथ गोरखपूर तर अखिलेश यादव करहलमधून आघाडीवर होते.
उत्तर प्रदेशात भाजप सत्तेकडे आगेचूक करताना सध्यातरी दिसत आहे. मात्र समाजवादी पार्टीनेही मोठ्या जागेवर आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे भाजपाच्या जागा घटतानाही दिसत आहेत. अखिलेश यादव यांनी इम्तिहान अबी बाकी है म्हणत विजयाचा दावा केला आहे.
उत्तर प्रदेशातील जवळपास 300 जागांचे कल हाती येत असून सपा आणि भाजपमध्ये कडवी लढत आहे.
यूपीत भाजपचे महत्त्वाचे नेते आघाडीवर
अखिलेश यादव आघाडीवर
योगी आदित्यानाथ आघाडीवर
शिवपाल यादव पिछाडीवर
सिराथूचे मतदारसंघातून भाजपचे केशवप्रसाद मौर्य पिछाडीवर