हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज महाराष्ट्रातील 75 हजार कोटी रुपयांच्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर ठीक 9.30 वाजता दाखल झाले. यावेळी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर ते नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचले. याठिकाणी त्यांच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर या “वंदे भारत एक्स्प्रेस” गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
यावेळी राज्यपाल भगतसिह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीला वंदे मातरम एक्स्प्रेसची पाहणी केली. तसेच विविध प्रकल्पाची त्यांनी माहितीही घेतली.
LIVE | Hon PM @narendramodi ji flagging off Nagpur to Bilaspur #VandeBharat Express
नागपूर ते बिलासपूर 'वंदे भारत' एक्सप्रेसचे उद्घाटन | नागपूर#MahaSamruddhi #Nagpur #NarendraModi #Maharashtra https://t.co/bY201dxhyG— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 11, 2022
नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला खूप विशेष प्राप्त झाले आहे. नागपूर व अजनी या दोन रेल्वेस्थानकांच्या कामासाठी अनुक्रमे 590 आणि 360 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.