हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपली हाडे मजबूत असतील तरच आपले शरीर मजबूत आहे असं म्हणत जात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी हाडे मजबूत असं आवश्यक आहे. शरीराची हालचाल हाडांशी निगडित असल्याने ती बळकट असणे आवश्यक आहे. परंतु हल्लीच्या धावपळीच्या जीवनात अयोग्य आहार, व्यायाम न करणे यामुळे हाडे ढिसूळ बनू लागली आहेत. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ खायला सांगणार आहोत ज्यामुळे आपली हाडे मजबूत बनतील .
मजबूत हाडांसाठी कसा असावा आहार –
अंडी-
अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. अंड खाल्ल्यामुळे शरीराला असलेली प्रोटीनची गरज पूर्ण होते आणि हाडे मजबूत होण्यासाठी आपल्याला बळ मिळते.
दूध–
दूध पिल्याने आपले वजन वाढण्यास मदत होते. दुधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असते तसेच प्रोटीनची असते त्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी रोज १ कप दूधाचा आहार करावा. दही, ताक, लोणी पनीर यांचाही आहारात समावेश करावा यामुळेही आपल्या हाडांना मजबुती मिळेल.
ड्राय फ्रुट-
हाडे मजबूत करण्यासाठी ड्राय फ्रुट म्हणजेच काजू, बदाम, नियमितपणे खावे. ड्राय फ्रुट मध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
हिरव्या पालेभाज्या –
हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शिअम आणि जीवनसत्त्व ‘क’ मुबलक प्रमाणात असते. लहानपणापासून संतुलित आहार घेतल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते. शरीरात कॅल्शिअम शोषण्यास मदत करण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज असते.
तीळ-
तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते.१०० ग्राम तीळामधून ९७५ mg कॅल्शिअम मिळते त्यामुळे मजबूत हाडांसाठी तीळ खाल्ला पाहिजे. तीळ कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशियमची आवश्यकता पूर्ण करतं.
मजबूत हाडांसाठी काय खाऊ नये-
आपले हाडे मजबूत करण्यासाठी जस आवश्यक पदार्थ खाणे गरजेचं आहे तसेच अनावश्यक पदार्थ टाळणेही तितकंच महत्त्वाचे आहे. त्यासाठी फास्ट फूड, खारट पदार्थ, चरबीचे पदार्थ किंवा तेलकट वस्तू खाऊ नये. यामध्ये कोणत्याही प्रकारची पोषकद्रव्ये नसतात. तसेच चहा, कॉफी , कोल्ड्रिंक यांचे सेवन टाळण्याचा प्रयत्न करावा कारण या पदार्थामुळे हाडे कमजोर होण्याची शक्यता असते.