हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल प्रत्येकाला वजन वाढीच्या समस्येने त्रस्त आहेत. आहारातील वेगवेगळ्या पदार्थाचा समावेश, अपुरा व्यायाम, न झालेली हालचाल तसेच भरपूर झोप आणि आळस हि वजन वाढीची कारणे असु शकतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचं असेल तर व्यायामासोबतच चांगला डाएट प्लॅन फॉलो करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी कोणकोणते पदार्थ खावेत याबाबत आज आपण जाणून घेऊया….
बदाम-
बदाम खाल्ल्याने भूक कमी लागते त्यामुळे वजन कमी करण्यात बदामाची मोठी मदत होते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, फायबर, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, ओमेगा 6 फॅटी अॅसिड आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. तसेच बदाम खाल्ल्याने चरबी कमी होते.
टरबूज खा-
जर तुम्ही वेगाने वजन कमी कराच असेल तर टरबूज खाणे तुमच्यासाठी खूप फायदेशीरआणि उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, टरबूजमध्ये भरपूर पाणी तसेच फायबर आणि इतर पोषक घटक असतात, ज्यामुळे ते वजन जलद कमी करण्यात उपयोगी ठरते.
ताक –
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवणात ताकाचा समावेश करा. ताकामध्ये निरोगी बॅक्टेरिया, कार्बोहायड्रेट्स आणि लैक्टोज असतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही साधे किंवा मसाला ताक जेवणासोबत पिऊ शकता.
ब्लॅक कॉफी-
वजन कमी करण्यासाठी तुम्ही ब्लॅक कॉफी देखील उपयोगी ठरेल. ब्लॅक कॉफीमुळे लठ्ठपणा नियंत्रित करण्यास मदत होते. ज्यांना पोटाची चरबी कमी करायची आहे, त्यांच्यासाठी ब्लॅक कॉफी हा सर्वात छान पर्याय मानला जातो.
जंक फूड टाळा-
जेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट सुरु करण्याचा विचार करत असता तेव्हा जंक फूडचे सेवन शक्य तितके टाळा. जंक फूड केवळ चरबीच वाढवत नाही, तर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या कमकुवत देखील करतं. त्यामुळे अशा प्रकारचे जंक फूड टाळावे.