Income tax :रोख रक्कम अन् सोन्याप्रमाणेच घरांच्या संख्येवरही काही मर्यादा आहेत का??? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income tax : स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. काही लोकं आपली कारकिर्द भरात असताना तर काही जण निवृत्तीनंतर एकरकमी पैसे देऊन घर खरेदी करतात. मात्र, भारतीय कायद्यानुसार आपल्याला किती घरे विकत घेऊ शकतात याची देखील माहीती आपल्याकडे असायला हवी. काही लोकांना वाटते की घरात ठेवलेले पैसे आणि सोन्याप्रमाणेच घरासाठी देखील काही मर्यादा असतील. चला तर मग आज आपण याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेउयात …

I have 3 house properties. How to calculate tax on income from them | Mint

तज्ञ सांगतात कि…

इन्व्हेस्टमेंट मार्केटशी संबंधित तज्ञ सांगतात कि,”तुमच्याकडे किती घरे आहेत किंवा तुम्हाला किती घरांसाठी होम लोन घ्यायचे आहे याकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट लक्ष देत नाही. मात्र यासाठी काही नियम जरूर आहेत… ” income tax

Income Tax on Vacant Property: Things You Should Know

रोख रक्कम आणि सोन्याप्रमाणेच यामध्ये देखील हीच गोष्ट लागू होते. समजा एखाद्याच्या नावावर 5 किंवा 10 घरे रजिस्टर्ड असतील तर ते कायदेशीर तपासणीच्या फेरीत येऊ शकतात. या प्रकरणातही घराच्या मालकाला त्याच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांचा तपशील द्यावा लागेल किंवा ही घरे त्याच्याकडून वारसाहक्काची आहेत हे सिद्ध करावे लागेल. मात्र जर त्या व्यक्तीच्या उत्पन्नाचे स्रोत योग्य असतील आणि त्याने योग्य पद्धतीने पैसे दिले असतील तर त्याला घाबरण्याची काहीच गरज नाही. income tax

किती घरांसाठी टॅक्समध्ये सूट मिळेल ???

कोणत्याही व्यक्तीला कितीही घरे खरेदी करता येतील, मात्र त्याला फक्त 2 स्वत:च्या ताब्यात असलेल्या घरांवरच टॅक्स सूट दिली जाईल. जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांना घर दिले असेल तर ते घरही स्वत:च्या मालकीचे मानले जाते. अशा प्रकारे, कर कायदा सांगतो की,” तुम्हांला कितीही घरांसाठी होम लोनच्या री-पेमेंटसाठी टॅक्स सूट घेऊ शकाल. income tax

Budget restricts tax benefit on second house to Rs 2 lakh - BusinessToday

इथे हे समजून घ्या की, एखाद्या व्यक्तीसाठी 80C अंतर्गत, जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांवरच कर सवलत दिली जाते. जर तुम्ही तुमच्या घरांसाठी 10 लाख रुपये वार्षिक री-पेमेंट करत असाल तर तुम्हाला फक्त 1.50 लाख रुपयांवरच सूट मिळेल. री-पेमेंटव्यतिरिक्त, 2 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर भरलेले व्याज देखील करपात्र आहे. याध्ये तुम्ही तुमच्या दोन्ही घरांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत टॅक्स वाचवू शकाल. income tax

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://incometaxindia.gov.in/

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण, नवीन भाव तपासा

OnePlus 10T : OnePlusने लॉन्च केला दमदार मोबाइल; फक्त 19 मिनीटांत होणार फुल्ल चार्ज

PM Kisan मध्ये काही शेतकऱ्यांना पुढील हप्त्यात 2 हजारांऐवजी मिळतील 4 हजार रुपये !!!

Income tax : घरामध्ये रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती आहे ??? अशा प्रकारे समजून घ्या !!!

‘या’ बँकांकडून दिले जात आहे सर्वात स्वस्त Car Loan, व्याज दर तपासा