हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या आयकर विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बढया उद्योजकांवर कारवाई केली जात आहे. आयकर विभागाच्यावतीने आज पुण्यात सुमारे आठ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांचे निकटवर्तीय पुण्यातील बडे उद्योजक असलेले सिटी ग्रुपचे चेअरमन अनिरुद्ध देशपांडे यांच्या घर आणि कार्यालयावर विभागाने छापा टाकला.
पुण्यात आज आयकर विभागाच्यावतीने छापेमारीची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 8 ठिकाणी छापे टाकण्यात आले. सिटी ग्रुपचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. त्यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती भल्या पहाटेपासूनच सुरू आहे. देशपांडे यांच्या कार्यालयासह घर आणि अन्य ठिकाणी देखील ही तपासणी केली जात आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याची चर्चा केली जात आहे.
खासदार शरद पवार यांचे निकटवर्तीय व पुण्यातील बडे प्रस्थ असलेल्या देशपांडे यांच्यावर प्राप्तिकर विभागाची छापीमारी झाल्यामुळे पुण्यातील उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे. देशपांडे यांचे राज्यातील बड्या राजकाराण्यांशी सलोख्याचे आणि निकटचे संबंध आहेत.