नवी दिल्ली । आयकर विभाग (Income Tax Department) पुढच्या महिन्याच्या सुरूवातीला करदात्यांसाठी नवीन ई-फाइलिंग वेब पोर्टल सादर करण्याची तयारी करत आहे. आयटीआर (Income Tax Return) भरण्यासाठी आणि टॅक्स संबंधित इतर कामांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. नवीन पोर्टल अधिक सोयीस्कर होईल, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. विद्यमान वेब पोर्टल 1 जून ते 6 जून दरम्यान बंद असेल.
विभागाच्या सिस्टम विंगने बुधवारी जारी केलेल्या आदेशानुसार जुन्या पोर्टलवरून नवीन पोर्टलकडे जाण्याचे काम पूर्ण केले जाणार असून ते सात जूनपर्यंत कार्यान्वित केले जाईल. आदेशानुसार तक्रारीची सुनावणी किंवा निराकरण करण्यासाठी अधिका्यांना 10 जून नंतर तारीख निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरुन करदात्यांना नवीन सिस्टीम चांगल्या प्रकारे समजू शकेल. या दरम्यान करदात्यास आणि विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये ठरविलेले कोणतेही काम पुढे ढकलले जाऊ शकते, असेही या आदेशात म्हटले आहे.
आयटीआर विभागाने म्हटले आहे की, स्थलांतरणामुळे करदात्यांना 1 जून 2021 पासून अस्तित्त्वात असलेल्या http://incometaxindiaefilling.gov.in वर वेबसाइटवर लॉग इन करता येणार नाही. एका नवीन वेबसाइटसाठी आपण http://INCOMETAX.GOV.IN वर भेट देऊ शकता. विभागाने असे म्हटले आहे की, 7 जूनपासून सर्व करदात्यांनी आपले काम या वेबसाइटवर करावे.
आयटीआर 31 मे पर्यंत भरता येईल
विभागाने नुकतेच असेसमेंट 2020-21 या वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अंतिम मुदत वाढविली आहे. आता करदाता 31 मे 2021 पर्यंत रिटर्न भरू शकतात. CBDT ने जारी केलेल्या नवीन परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. ज्यांनी मागील आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही, ते आता 31 मे पर्यंत भरू शकतात.
सुधारित ITR कसे दाखल करावे
करदात्यास इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई-फाईलिंग पोर्टल http://www.incometaxindiaefiling.gov.inवर जावे आणि रिवाइज्ड ITR दाखल करण्यासाठी रिवाइज्ड रिटर्न भरण्याचा पर्याय निवडावा लागेल. रिवाइज्ड टॅक्स रिटर्न भरण्याची संख्या निश्चित नाही परंतु रिटर्नच्या स्क्रूटनी असेसमेंटनंतर रिवाइज्ड रिटर्न भरता येणार नाही.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group