हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Return : देशातील प्रत्येक नागरिकांसाठी इनकम टॅक्स भरणे बंधनकारक आहे. प्रत्येक आर्थिक वर्षासाठी नागरिकांना इन्कम टॅक्स भरावा लागतो. मात्र आता करदात्यांना इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून इनकम टॅक्स रिटर्न भरण्याविषयी नोटिस मिळत आहेत. हे लक्षात घ्या कि, 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ITR भरणे गरजेचा आहे. जर त्याच्या उत्पन्नावर कोणताही TDS कापला जात असेल किंवा तो विहित सूट मर्यादेमध्ये असेल तर त्यांना दिलासा मिळू शकेल. हे लक्षात घ्या कि, ज्येष्ठ नागरिकांसाठी सूटीची मर्यादा 3 लाख रुपये तर सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 5 लाख रुपये आहे.
आयटीआर फायलिंगचे स्टेटस
इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून पाठवण्यात आलेल्या या माहितीमध्ये करदात्यांच्या आयटीआर फायलिंगचे (Income Tax Return) स्टेटसदेखील असेल. उदाहरणार्थ, जर एखाद्याने आयटीआर ऑनलाइन भरण्यास सुरुवात केली असेल मात्र काही कारणास्तव त्याने ती प्रक्रिया मध्येच सोडून दिली असेल तर अशा परिस्थितीत इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून त्या करदात्यांना मेसेज पाठविला जाईल.
सध्याच्या काळात बहुतेक करदात्यांकडून आयटीआर (Income Tax Return) ऑनलाइन भरला जातो. मात्र अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे एखाद्याचे आयटीआर फायलिंग पेंडिंग राहू शकते. अथवा माहितीच्या अभावी एखाद्या व्यक्तीकडून आपला रिटर्न फाईल करण्याची प्रक्रिया मध्येच सोडून दिली जाऊ शकते.
रिटर्नचे व्हेरिफिकेशन करावे लागेल
इथे हे लक्षात घ्या कि, फक्त आयटीआर (Income Tax Return) सादर केल्याने फायलिंगची प्रक्रिया पूर्ण होत नाही. यासाठी करदात्यांना रिटर्नचे व्हेरिफिकेशन करणे देखील आवश्यक आहे. हे व्हेरिफिकेशन ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येते. ऑफलाइन व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला बेंगळुरूमधील सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटरकडे (CPC) आपली स्वाक्षरी केलेला ITR-V पाठवता येईल.
अशा प्रकारे करता येईल ई-व्हेरिफिकेशन –
>> आधार OTP वापरून
>> बँक खाते, नेट बँकिंग किंवा डीमॅट खात्याद्वारे जरनेटेड ईव्हीसी वापर करून
>> डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC) द्वारे
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/Pages/default.aspx
हे पण वाचा :
Samsung Galaxy M04 स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च, फिचर्स अन् किंमत पहा
Interest Rates on Savings Account : ‘या’ बँकांच्या बचत खात्यावर मिळेल 7.5% पर्यंतचा व्याज दर
Home Loan : आता ग्राहकांना पुन्हा बसणार महागड्या कर्जाचा फटका, अनेक बँकांनी व्याजदरात केली वाढ
LIC Jeevan Labh Policy : एलआयसीच्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा 54 लाखांचा रिटर्न
7th Pay Commission : नव्या वर्षात सरकार कर्मचार्यांना देणार ‘या’ 3 मोठ्या गुड न्युज