हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Slab : बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या गेल्या. तसेच यावेळी अर्थसंकल्पामध्ये सरलीकृत टॅक्स सिस्टीम अंतर्गत, नवीन इन्कम स्लॅब आणि दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. मात्र, यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नवीन किंवा जुन्या टॅक्स सिस्टीम (Income Tax Slab) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकां आपला इन्कम टॅक्स रिटर्न भरता येईल. तसेच जेव्हा ते 2023-24 साठीचा ITR दाखल करण्यासाठी जातील तेव्हा त्यांना दोन्ही पर्याय उपलब्ध होतील. याबाबतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, ई-फायलिंग वेबसाइटवर डीफॉल्ट सिस्टीम म्हणून नवीन टॅक्स सिस्टीमच दिसून येईल. अशातच ज्येष्ठ नागरिकांना जुन्या टॅक्स सिस्टीममध्ये जाण्याचा पर्यायही उपलब्ध असेल.
कोणता टॅक्स स्लॅब आणि दर लागू होईल???
जर आपण या वर्षी (मूल्यांकन वर्ष 2023-24 किंवा आर्थिक वर्ष 2022-23 साठी) ITR भरत असाल तर लागू टॅक्स स्लॅब आणि रिटर्न भरण्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच असतील. Income Tax Slab
ज्येष्ठ नागरिकांसाठीचे टॅक्स स्लॅब आणि दर-
AY2024-25 (FY 2023-24) मधील ITR फाइलिंगसाठी नवीन टॅक्स सिस्टीम स्लॅब आणि दर –
0-3 लाख रुपये – 0
3-6 लाख रुपये – 5%
6-9 लाख रुपये – 10%
9-12 लाख रुपये – 15%
12-15 लाख रुपये – 20%
15 लाखांपेक्षा जास्त – 30% Income Tax Slab
AY2023-24 (FY 2022-23) मध्ये ITR फाइलिंगसाठी नवीन टॅक्स सिस्टीम स्लॅब आणि दर –
0 ते रु. 2.5 लाख रुपये – 0
2.5 ते 5 लाख रुपये – 2.5 लाखांपेक्षा 5%
5 लाख रुपये ते 7.5 लाख रुपये – 12,500 रुपये + 5 लाखांपेक्षा 10%
7.5 लाख रुपये ते 10 लाख रुपये – 37,500 रुपये + 7.5 लाखांपेक्षा जास्त 15%
10 लाख रुपये ते 12.5 लाख रुपये – 75,000 रुपये + 10 लाखांपेक्षा जास्त 20%
12.5 लाख रुपये ते 15 लाख रुपये – 1,25,000 रुपये + 12.5 लाखांपेक्षा जास्त 25%
15 लाखांपेक्षा जास्त – 1,87,500 रुपये + 15 लाखांपेक्षा जास्त 30% Income Tax Slab
AY2023-24 (FY2022-23) मधील ITR फाइलिंगसाठी जुने टॅक्स सिस्टीम स्लॅब आणि दर
3 लाख रुपये – 0
3-5 लाख रुपये – 3 लाखांपेक्षा 5%
5-10 लाख रुपये – 10,000 रुपये + 5 लाखांपेक्षा जास्त 20%
10 लाखांपेक्षा जास्त – 1,10,000 रुपये + 10 लाखांपेक्षा जास्त 30% Income Tax Slab
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/Pages/default.aspx
हे पण वाचा :
Gold Price : आठवड्याभरात सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
LIC च्या पॉलिसीमधील नॉमिनी बदलण्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या
Multibagger Stock : अवघ्या 2 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
MS Dhoni दिसणार चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, सोशल मीडियावर फोटोने घातला धुमाकूळ
आता WhatsApp वर मिळवा LIC पॉलिसीशी संबंधित प्रत्येक माहिती, घरबसल्या उपलब्ध होणार ‘या’ सेवा